सांगली मिरज येथील कर्नाळ येथील ३५ वर्षीय एक व्यक्ती आजींचे निधन झाल्याने आजोळी सातारा येथे गेले होते. तर त्या ठिकाणी मुंबई येथील मावसभाऊ देखील आला होता. सातारा येथील घरी एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे सांगली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना सातारा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळविल्याने खळबळ उडाली होती. तर २ मे रोजी कर्नाळ येथील व्यक्तीला मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे आयसोलेशन करण्यात आले होते. त्या व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती तथापि, या व्यक्तीची कोरोना चाचणी सकारात्मक राहिली आहे. या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले आहे आणि वैद्यकीय पथक त्या ठिकाणी पोहोचले आहे. तर या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.


उपचाराखालील रुग्णांची संख्या ७
सांगली येथील सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सात झाली असून यामध्ये निगडीतील (ता शिराळा) येथील तर कामेरीमधील (ता. वाळवा) ९४ वर्षीय एक वृद्धा , दूधभावी येथील पती पत्नी आणि कुपवाड मधील एक युवती असे सहाजण असून काल कर्नाळ येथील रुग्णाची भर पडली आहे.