चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने आपल्या पुढील फ्लॅगशिप Vivo X50 चे टीझर जारी केले आहे. विवोने चाइनीज मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट Weiboवर एक व्हिडिओ पोस्ट करत हि माहिती दिली आहे. कंपनी कॅमेरा मॉड्यूलवर फोकस करीत आहे,त्यामध्ये पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि दोननॉर्मल लेन्स आहेत. एक मोठा लेन्स दिसत आहे जो प्राथमिक लेन्स आहे. यात खास गोष्ट अशी आहे की ती गिंबलसारखी आहे आणि रोटेट करते. लेन्स रोटेट करणे म्हणजे व्हिडिओ स्टेब्लाइजेशनसाठी ते चांगले असू शकते.
गेल्या काही दिवसापासून सॅमसंग सोबत बऱ्याच कंपन्या आपल्या स्मार्टफोन मध्ये स्टॅबलायझेशन वर फोकस करत आहेत. गिम्बल सारखा एक्सपरीयंस देण्यासाठी काही स्मार्टफोन कंपन्या तयारी करत आहेत.

Vivo X50 Pro ला कंपनी चीन मध्ये १ जून ला लॉन्च करू शकते. टीजर विडिओ बद्दल बोलायचं तर यामध्ये गिम्बल स्टेब्लाइजेशन टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार लेन्स मानवाच्या डोळ्यासारखं काम करत.
आपण टीजर विडिओमध्ये कॅमेरा लेन्स रोटेट होताना पाहू शकतो जो कोणत्याही डायरेक्शन मध्ये फिरू शकतो. या मोड्यूल मध्ये एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत. तर यात ऑप्टिकल झूम साठी डेडिकेटेड पेरिस्कोप कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे.

सॅमसंगने अलीकडेच नवीन ISOCELL GN1 सेन्सर सादर केला आहे जो व्हिवो एक्स 50 प्रो (Vivo X50 Pro) मध्ये वापरला जाऊ शकतो. कंपनीने वीवो एक्स 50 प्रो मध्ये दिलेल्या स्पेसिफिकेशन्सबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल, म्हणून त्यात Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.तर यामध्ये 6.56 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो.डिस्प्ले रीफ्रेश रेट 120Hz असण्याची शक्यता आहे.