
चंद्रपूर दि. 18 मे : लॉकडाऊनच्या काळामध्ये जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील अनेक कामगार तेलंगणामध्ये अडकलेले होते. त्यापैकी आज दुपारी 2 वाजता गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील 28 कामगार चंद्रपुरात दाखल झाले होते ते आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे सूचनेनंतर एसटी बसने त्यांच्या स्वगावी पोहोचविण्यात आले.
तेलंगणा राज्यातून आलेले कामगार हे गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या ठिकाणाहून त्यांच्या स्वगावी परत जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सर्व कामगारांची नोंदणी करण्यात आली असून शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,क्र.1 इंदिरानगर येथे थर्मल स्क्रिनींगद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 13 पुरुष व 9 महिला कामगार तर 6 लहान मुलांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून या सर्व कामगारांच्या चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती .कामगारांनी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
यावेळी सहसमन्वयक पालकमंत्री यांचे कार्यालय चंद्रपूर उमेश आडे, चंद्रपूरचे नायब तहसीलदार अजय भास्करवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, आरोग्य सेविका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
00000
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता