Apple ने आयओएस 13.5 वर नवे अपडेट जारी केले आहे. Appleचे सीईओ टिम कुक यांनी स्वत: ट्विटमध्ये या व्हर्जन मध्ये  दिलेल्या नवीन फिचरविषयी माहिती दिली आहे. सध्या जगभरातील आयफोन वापरकर्त्यांसाठी हे अपडेट खूप महत्वाचे आहे.
Person Holding Phone Taking Picture of Served Food
या अपडेटमध्ये तीन महत्वाचे फीचर्स देण्यात आले आहेत. कोरोना महामारीचा उद्रेक पाहता हि तिन्ही फीचर्स देण्यात आलेले आहेत. या अपडेटनंतर, फेस आयडी असलेल्या आयफोन वापरकर्त्यांना मास्क असल्यावरही फोन अनलॉक करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

फोनमध्ये दिलेला फेस आयडी आपला मास्क डिटेक्ट करून घेईल. मास्क डिटेक्ट झाल्यावर फोनमध्ये स्वाइप अपचा ऑप्शन येईल. त्यानंतर आपण स्वाइप करून आणि संकेतशब्द प्रविष्ट करुन फोन अनलॉक करू शकता.


यापूर्वी फेस आयडी मास्क शोधू शकत नव्हता, या कारणामुळे एकाधिक अटेंप्ट मुळे फोन अनलॉक करण्यासाठी बराच वेळ लागत असे. iOS 13.5 मध्ये अँपल आणि Google द्वारे विकसित केलेली एक्सपोजर नोटिफिकेशन API देखील उपलब्ध आहे. याद्वारे आपण सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाद्वारे निर्मित अ‍ॅप वापरू शकता, जे कोविड -१९ positive वापरकर्त्याच्या संपर्कात आल्यावर सूचना पाठवते.
 
तथापि, एक्सपोजर नोटिफिकेशन फिचरजवळ असे लिहिलेले आहे की सध्या हे आपल्या भारतात सपोर्ट  करत नाही. जोपर्यंत याचा API  वापरून एखादा अँप तयार केला जात नाही तोपर्यंत हे सक्रिय हणार नाही. पुढे एखादा अँप तयार झाल्यास या फिचर ला आपण वापरू शकू.

याच सोबत विडिओ calling संदर्भात एक फिचर सुद्धा लॉंच करण्यात आले आहे. यामध्ये ग्रुप कॉल चालू असताना एखादा युजर जर चॅट सोडून गेला तर तेथील विंडो मोठी होते.