जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

[Best] 25 प्रेम शायरी मराठी – Prem Shayari in marathi

Prem shayari in marathi, love Marathi Shayri, Love Status shayari marathi, – प्रेमाचे मराठी शायरी

प्रेम म्हणजे आंतरिक अस्तित्वाची स्पर्श करण्याची कला, एक कोमल भावना, एक आनंददायक भावना, एक न समजण्यासारखे कोडे.


Prem quotes in marathi – प्रेम शायरी मराठी

✍️
“तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना
आंधळ करून जात असतं
तू दूर असशील तरी
माझ्या जवळ आहेस
याची जाणीव करून देतं असतं…”
📌
✍️

“निळाईच्या गर्द ह्रदयात
एकदातरी सामावून घेशील का ?
आकाशाचं स्वप्न नको मला
एकदातरी आपलं म्हणशील का ?

📌
✍️
“ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते..
नकळत आवडलेलीस तू
माझे मलाच कळले नव्हते..”
✍️
“काळाच्या ओघात कळालेच नाही,
आयुष्य कसे कुठे फाटले,
तू भेटलीस आणि
जरा जगावसं वाटले…”

✍️
“तुझा तो पहिला स्पर्श
आजही मला आठवितो..
ते दुर्मिळ रोमांचीत क्षण
आजही मनात साठवितो….”
✍️
“स्पर्श तुझा व्हावा,
अन देह हा माझा लाजून चूर व्हावा…
हक्काने मिठीत तू घ्यावेस,
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा…”
✒️
✍️
“अशाच एका वळणावरती
तुझी-माझी भेट झाली…
तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या
भेटीची ओढ लागली..”
✍️
“झोंबते ही गार हवा
बघ कसा माझ्या तनी..
सांगु कसे साजना तुजला
मज आता लाज येते मनोमनी…”
✍️
“प्रेम काय आहे
माहिती नाही मला
पण ते तुझ्याइतकच
सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला…”
✍️

“कळलंच नाही मला,
प्रेम तुझ्यावर कसं झालं..
मी फक्त जीव लावला,
हृदय केव्हाच तुझं झालं..”
✍️

“बघता बघता बघ कशी
माया तुझ्यावर जडली
आणि मनावर माझ्या प्रेमाची
लकेर तू ओढली..

✍️
“तू मला खूप आवडतेस,
बोलण्याकरिता जीभ ही वळत नाही..
जेव्हा असतं बोलायचं,
तेव्हा ओठांना शब्दचं मिळत नाही..”
✍️
“तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील..
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार..”
✍️
प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की
ती ठरवून होत नाही ग
त्यासाठी दोन व्यक्तिची
मने जुळावी लागतात
prem quotes in marathi
✍️
“जवळीक साधून माझ्याशी..
कशी किमया केलीस…
वेड लावून माझ्या मनाला
तु का निघून गेलीस…”
✍️
“खरं प्रेम
खुप जवळ असतं..
फक्त त्याला शोधणारी नजर
जवळ असली पाहिजे…”
✍️

“तुझ्यासाठीच मला
सागर बनायचं आहे
तुझ्यासाठीच मला
मोती होऊन राहायचं आहे ….”

“जेव्हा जवळ यायचा तू
श्वास माझा फुलायचा
अन तुलाच पाहावेस वाटायचे
तुझ्या मिठीत हरवून जावे वाटायचे
तुला प्रेम करत तुलाच
स्वाधीन होऊन जायचे….

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या