मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. - -CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/AjHM5lSdt1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 1, 2020
आज १ मे, म्हणजे आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा विजय दिन, महाराष्ट्राचा स्थापना दिन आणि त्याच बरोबरीने कामगार दिन सुद्धा आहे. महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा!
संयुक्त महाराष्ट्र म्हटल्यानंतर मला जुन्या आठवणी आठवतात, ज्या मला आजोबांनी, शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्या आहेत, तो काळ संघर्षाचा होता. मुंबई आपल्याला मिळाली ती अशीच नाही मिळाली, बलिदान करून आपण मिळवली आहे.
आज मी हुतात्मा स्मारकाला वंदन करून मंत्रालयात ध्वजारोहण करून आलो. आजपर्यंत हुतात्मा चौकात अनेकदा गेलो आहे पण आज क्षणभर का होईना पण माझ्या अंगावर रोमांच उभे होते. ज्यांनी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी बलिदान केलं त्या स्मारकाला मी त्याच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून वंदन करत होतो.योगायोगाने महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणजे ज्या गिरणी कामगारांनी पराक्रमाची शर्थ करून मुंबई मिळवून दिली ते दोन्ही दिवस एकत्र आलेले आहेत. त्या कामगारांना ज्यांनी संघर्षामध्ये कष्ट घेतले, बलिदान केले,रक्त सांडले त्या ज्ञातअज्ञात सर्वांना मानाचा मुजरा करून मी आपल्याशी संवाद साधतो.मी १९६० च्या गोष्टी नाही करत पण मला २०१० चा दिवस आठवतोय. २०१० म्हणजे संयुक्त महाराष्ट्राला ५० वर्षे झाली होती. ती ५० वर्षे ज्या पद्धतीने साजरी केली होती ते सगळे प्रसंग, सगळ्या घटना जे जे तिथे उपस्थित होते त्यांना आठवल्याशिवाय राहणार नाही.मी जिथे राहतो, कलानगर, त्याच्या बाजूला बीकेसी आहे. १ मे २०१० ला लाखो लोक तिथे जमली होती. शिवसेनाप्रमुख होते, बाबासाहेब पुरंदरे होते आणि विशेष म्हणजे लता दीदी होत्या. लता दीदी, तुम्हाला सुद्धा मी नमस्कार करतो, तुमचे सुद्धा आशीर्वाद पाहिजेत, ते आहेतच.शिवसेनेच्या माध्यमातून गोरेगाव येथे एक्झिबिशन ग्राउंड आहे, तिथे रक्तदानाचा विश्वविक्रम केला होता. त्याच्यामागे एक कल्पना अशी होती की अनेक हुतात्म्यांनी रक्त सांडून मुंबई आपल्याला मिळवून दिली होती, त्या मुंबईच्या रक्षणासाठी आम्ही रक्तदान करून शपथबद्ध होत आहोत.मला अभिमान आहे अवघ्या १२ तासांत २५,००० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून एक विश्वविक्रम केला, तो आजदेखील महाराष्ट्राच्या नावावर आहे.जसं बीकेसी मध्ये आपण प्राथमिक आरोग्य केंद्र उभं करतोय अनेक बेडचं, तसचं गोरेगाव येथील ग्राउंडवर सुद्धा आपण बेड्स करतोय. त्यात काही ऑक्सिजन देणारे बेड असतील, काही प्राथमिक उपचार देणारे बेड असतील, फिव्हर क्लिनिक करतो आहोत.सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राने मनात आणले तर महाराष्ट्र घडवू शकतो, महाराष्ट्र करू शकतो, महाराष्ट्राने जो रक्तदानाचा विश्वविक्रम केला आहे तो महाराष्ट्रच करू जाणे. तोच महाराष्ट्र कोरोनाच्या विरोधात लढायला उभा आहे, नव्हे लढतो आहे.लॉकडाऊन म्हटल्यावर आपल्याला असे वाटते की टाळेबंदी झाली आहे, मी त्याला वेगळा शब्द देतो, गतिरोधक. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी त्याला वेगळा शब्द दिला सर्किट ब्रेकर, म्हणजे ही विषाणूंची शृंखला आहे ती तोडणे.मला अभिमान वाटतोय की आपल्या मुंबईच्या महापौर किशोरी ताई आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौर या दोघी परिचारिका होत्या, या दोघींनीही तयारी दाखवली आहे की पुन्हा एकदा ती सेवा द्यायला तयार आहेत आणि दोघींनीही मध्येमध्ये हॉस्पिटलला जायला सुरुवात सुद्धा केली आहे.कोरोनाची दहशत आहे, त्या दहशतीतून आपण मोकळे झाले पाहिजेत. ज्याला मी कोविड सिंड्रोम म्हणेन. जर कोणी लवकर वेळेमध्ये आले तर बरे होऊ शकतात हे मी मागेही तुम्हाला सांगितलं होत, आजही सांगतोय. अगदी ६ महिन्यांच्या बाळापासून ८५ वर्षांच्या आजी सुद्धा बऱ्या होऊन घरी जात आहेत.
३ तारखेनंतर काय करणार?
आम्ही घरी किती बसणार? काय करायचं? अर्थचक्र रुतलं, आर्थिक फटका बसणार, बेकारी वाढणार, नोकऱ्या जाणार. हे थोडस खरं आहे. पण प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खरी संपत्ती ही त्या राज्याची आणि राष्ट्राची जनता असते. तिला प्राथमिकता द्यायला पाहिजे.
रेड झोनमध्ये मुंबई आणि मुंबईचा परिसर, कल्याण डोंबिवली परिसर, पुणे आणि आसपासचा परिसर, नागपूर आहे, संभाजीनगर आहे जिथे आकडे वाढत आहेत, तिथे काही सुरू करणे हे आपल्या हिताचं नाही आहे.
ह्या काढत असताना आपण आणखी एक गोष्ट करतोय की परराज्यामध्ये जे जाऊ इच्छित आहेत त्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे तीसुद्धा अत्यंत शिस्तीने, झुंबड केली तर ती सुद्धा परवानगी काढली जाईल. कारण हे खूप धोकादायक आहे.
कोणत्याही परिस्थितीत शेतीवर बंधन आपण पहिल्याही दिवशी टाकलं नाही होतं, आज ही टाकलं नाही आहे. शेतकऱ्यांचा मौसम सुरू होतोय, त्यांना बी, बियाणे, खत कशाचीही कमी पडणार नाही. तुमची शेती जशीच्या तशी चालू राहील.
डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, मेडिकल स्टाफ, पोलिस हे सगळे जण देवासारखे आपल्यासाठी खंबीरपणे लढत आहेत. त्यांना मदत करणे हे आपले काम आहेत.
३ तारखेनंतर, आता जेवढी बंधन आहेत, त्याच्यापेक्षा अधिक मोकळीक ही नक्की आपण प्रत्येक झोनप्रमाणे देणार आहोत. पण घाई गडबड न करता ही मोकळीक आपण देणार आहोत.
जे महाराष्ट्राचे वर्णन आहे, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा!
जो ज्या नजरेने बघतो, तसा महाराष्ट्र त्याला दिसतो. कोणी प्रेमाने वागला तर महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतो, जर दगाबाजी झाली तर दगाबाजाचं काय करायचं हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं आहे.
फुलांच्या देशा, पवित्र देशा! महाराष्ट्र संपन्न आहे, सुधारणावादी आहे, प्रगत आहे व देशालाच नव्हे, जगाला दिशा दाखवणारा आहे.अशा महाराष्ट्राचे आपण पुत्र आहोत, कन्या आहात. सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा निर्धार करतो की हे युद्ध आम्ही जिंकणारच!
जय हिंद, जय महाराष्ट्र!
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज दि. ०१/०५/२०२० रोजी दुपारी १:०० वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील.#WarAgainstVirus #महाराष्ट्रदिन
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 1, 2020
Facebook: https://t.co/J3EcbnZudK
Insta: https://t.co/xweUc46Gc6
YT: https://t.co/jJBLg1gQjP
Twitter: @CMOMaharashtra pic.twitter.com/Z2dJMFPEoR