पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या शूर सैनिक आणि सुरक्षा जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Narendra Modi on Twitter: "Irrfan Khan's demise is a loss to the ...

हंदवाडा येथे शहीद झालेल्या आमच्या शूर सैनिक आणि सुरक्षा जवानांना श्रद्धांजली. त्याचे शौर्य आणि त्याग कायम स्मरणात राहील. त्यांनी समर्पण भावना ठेवून, निष्ठेने देशाची सेवा केली आणि आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी अथक परिश्रम केले, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांच्या कुटूंबियांबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहे.


चकमकीत मेजरसह पाच जवान शहीद

जम्मू- कश्मीर येथील  हंदवाडा भागामध्ये झालेल्या चकमकीमध्ये भारताचे चार जवानांसहित एक पोलीस अधिकारी शहीद झाले. या चकमकीमध्ये सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्याना कंठस्नान घालण्यात यश आले. 

पुलवामा आणि हंदवाडा भागात शनिवारपासून अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरू होता. हंदवाडा येथे झालेल्या चकमकींमध्ये एक कमांडिंग ऑफिसर, 21 राष्ट्रीय रायफलचे एक मेजर , दोन सैनिक व एक पोलिस अधिकारी यांचा सहभाग होता. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर चकमकीनंतर स्थानिकांनी जवानांवर तुफान दगडफेक केली. लष्कर ए तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटने(टीआरएफ) ने हल्ल्याची जबाबदारी घेतली.