अमेरिकेला धडकी भरवणारे उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांच तब्बल 20 दिवसानंतर सार्वजनिक व्यासपीठावर दर्शन झाल आहे.  तर याबाबतचे वृत्त उत्तर कोरियातील माध्यमांनी प्रसिद्ध केलेला आहे.  झालं होतं असं की,  काही दिवसांपासून उत्तर कोरियाची हे  सर्वेसर्वा किंग जोंग उन  आजारी असल्याचे, तर काही वृत्त माध्यमांनी त्यांचे ब्रेन डेड झाल्याचे वृत्त दिले होते. तर काहींनी हृदयचा आजार असल्याचे...

उत्तर कोरियाची  सरकारी वृत्तसंस्था केसीएनए  यानुसार,रासायनिक खताच्या कारखान्याचे उद्घाटन किम यांनी केलेल आहे यावेळी किम यांचे स्वागत उपस्थितांनी जयघोषात केलेला आहे ते अकरा एप्रिल नंतर समाज माध्यमात आले नव्हते. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात देखील त्यांची उपस्तिथी दिसली नव्हती. ते त्यांच्या आजोबांच्या जयन्ती कार्यक्रमास देखील उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांच्या प्रकृती विषयी अटकळ लावली जात होती. पण त्यांनी आता पुन्हा सर्वांसमोर येत सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली आहे.

किम जोंग उन सोबत त्यांची बहीण किम यो जाँग  व वरिष्ठ नेत्यांसोबत कार्यक्रमाला उपस्थित होते असं के सी एन ए या वृत्तसंस्थेने सांगितलेल आहे . प्याँगयाँगमध्ये असलेल्या रासायनिक खतांच्या कारखान्याच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम होता.
KCNA नं आपल्या वृत्तात म्हटलंय, या कार्यक्रमावेळी किम यांनी भाषण देखील केल  आहे तसेच कारखान्याच्या माध्यमातून देशाच्या विकासामध्ये कशा प्रकारे भर घातली जाते याबाबतच त्यांनी यावेळी मत मांडलेला आहे तसेच उत्तर कोरिया मधील रासायनिक उद्योग आणि अन्नप्रक्रिया वरील उद्योग यांचेही कौतुक केलेल आहे.

काही दिवसांपूर्वी किम जाँग-उन यांच्या प्रकृतीविषयी सुरु असलेले उलटसुलट बातम्याचे दक्षिण कोरियाच्या प्रशासनानं खंडन केले  होतं.दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, 36 वर्षीय किम जोंग-उन यांच्या गंभीर आजाराबद्दल उत्तर कोरियाकडून काही संकेत प्राप्त झाले नाहीत.
तर काही दिवसांपूर्वी चीनच एक वैद्यकीय पथक उत्तर कोरियास रवाना  झाले असल्याची बातमी समाज माध्यमात फिरत होती.