नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांची माहिती

सोलापूर, दि. 5 – सांगोला नगरपरिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या ‘नगरसेतू’ मोबाईल ॲप्लिकेशनप्रमाणे जिल्ह्यातील इतर अकरा नगरपरिषदेतही  हा उपक्रम राबविणार असल्याचे प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी आज सांगितले. त्यांनी याबाबत आजच जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली असल्याचे सांगितले.

श्री. जावळे यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रसार थांबवायचा असेल तर प्रथम गर्दी करणे टाळायला हवी. यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी विविध उपाययोजना करायला सांगितल्या होत्या. त्यातूनच हे ॲप्लिकेशन  विकसित केले आहे. सांगोला नगरपरिषदतर्फे विकसित करण्यात आलेल्या ॲपव्दारे  किराणा माल, भाजीपाला, फळे, पाण्याचे जार, दूध, चिकन, मटण खरेदी करता येते.  मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी हे अप्लिकेशन विकसित केले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना तीनशे दुकांनदारांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ॲप्लिकेशन मध्ये घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) देणाऱ्या सर्व दुकानांचा समावेश आहे. शहरातील नागरिकांनी हे अप्लिकेशन स्वतःच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यांना हव्या असलेल्या वस्तूंची ऑर्डर नागरिकांना व्हाट्सॲपवर किंवा दुकानदारांना फोन करून  सदरची ऑर्डर देता येणार आहे, असे श्री. केंद्रे यांनी सांगितले. एकाच दिवसांत सुमारे पाचशे नागरिकांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केले आहे.

नागरिकांनी मेनू मध्ये दुकानदारांचे नाव,मोबाईल नंबर दिसणार आहेत तसेच निवड केलेल्या दुकानदारांना  WhatsApp वर किंवा कॉल करून ऑर्डर देता येणार आहे. ऑर्डर मिळाल्यानंतर दुकानदार ऑर्डर तयार करून घरी पाठवतील. दरम्यान आवश्यक असल्यास त्या दुकानदारांच्या मोबाईल नंबरवर नागरिक कॉल करू शकतील आणि नागरिकांचा नंबर सुद्धा दुकानदारांकडे जात असल्याने आवश्यकता पडल्यास दुकानदार नागरिकांना फोन करू करतील. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घरपोच सेवा मिळू लागल्यास शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे, असे श्री. केंद्रे यांनी सांगितले.

ॲपमध्ये सहभागी  विक्रेते संख्या:-

किराणा दुकानदार ::135

 भाजीपाला विक्रेते ::46

 फळ विक्रेते ::32

 मेडिकल दुकानदार ::47

 चिकन,मटण विक्रेते :: 23

 पाण्याचे जार विक्रेते ::9

 दूध पिशवी विक्रेते ::6

खालील लिंक वर क्लिक करून सदरचे ॲप install करावे –

https://bit.ly/2WpErMy


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता