
बुलढाणा : कोरोना विषाणू आपला विळखा पक्का करीत असताना शासनाने देशात लॉकडाऊन जाहीर केले. तसेच विविध उपाययोजना करून कोरोनाला थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कामांनाही स्थगिती देण्यात आली. यामागे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये हा उद्दात्त हेतू होता. लॉकडाऊन कालावधीत काम नसल्यामुळे बेरोजगार नागरिकांना उदरनिर्वाहाची चिंता सतत होती. मात्र शासनाने काही अटींवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यात या लॉकडाऊनच्या कालावधीत ९ हजार ८०९ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे.
सध्या जिल्ह्यात १८९६ कामे सुरू असून त्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या कामांचा वाटा मोठा आहे. बेरोजगारीमुळे होणारी फरफट लक्षात घेता शासनाने मनरेगाची कामे सुरू करून खूप मोठा दिलासा दिला आहे. मनरेगाची मजूरीही विनाविलंब आठवड्याला मजूरांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे त्याची चिंताही मिटली आहे. मनरेगातंर्गत एप्रिल २०२० पासून २३८ रूपये प्रति दिवस मजूरीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मनरेगाचे कामावर कामाचे सप्ताह समाप्ती नंतर १५ दिवसाचे आत मजूरी प्रदान केली जाते. वेळेवर प्रदानाचे बाबत जिल्ह्याची टक्केवारी १०० टक्के असून सदर बाबतीत जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. मजूरी संबंधित मजूराचे बँक खात्यात प्रदान केल्या जाते. त्यामुळे मजूरीस विलंब लागत नाही. या योजनेतंर्गत सिंचन व जलसंधारण कामे प्राधान्याने करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत. तसेच वैयक्तिक लाभाची कामे अंतर्गत विहीरी, फळबाग लागवड, गायी / शेळ्यांचा गोठा, शेततळे, रेशीम विकास कामे, शौचालये, शेतीची बांध बंधीस्ती व दुरूस्तीचे कामे केल्या जातात.
जिल्ह्यात सर्वात जास्त मनरेगाचे कामावरील १५३२ मजूर मेहकर तालुक्यात आहे. तसेच चिखली तालुक्यात मजूरांची उपस्थिती ११९२ आहे. बुलढाणा तालुक्यात ६३८, देऊळगाव राजा ५६२, जळगाव जामोद ८३६, खामगाव ९९६, लोणार ३३६, मलकापूर ४४९, मोताळा ९०४, नांदुरा ६२९, संग्रामपूर ७७५, शेगाव ५३३ आणि सिंदखेड राजा तालुक्यात ४२७ मजूरांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे सर्वात जास्त २४७ कामे चिखली तालुक्यात सुरू आहेत. तर संग्रामपूर तालुक्यात २०१ कामे सुरू आहे. बुलडाणा तालुक्यात १२७, दे. राजा ७५, जळगाव जामोद १९३, खामगाव १७८, लोणार ८७, मलकापूर ७७, मेहकर १६८, मोताळा १६६, नांदुरा १४७, शेगाव १३४ आणि सिंदखेड राजा तालुक्यात ९६ कामे सुरू आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण १८९६ कामे सध्या सुरू आहेत.
मजूरही शारिरीक अंतर व मास्क घालून काम करीत आहेत. चिखली तालुक्यातील बोरगाव वसू येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकेत काम करणाऱ्या मजूरांना मास्कचे वितरणही करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसलेल्या मजूरांसाठी मनरेगा धावूनच आली आहे. या योजनेमुळे मजूरांना काम मिळून त्यांना मजूरीतून मिळणाऱ्या पैशामुळे उदरनिर्वाहाची चिंता मात्र मिटली आहे.
00000
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता