राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावत 'जनता विरोध करत असेल तर त्याला ट्रोलिंग समजू नका' असे म्हंटले आहे. भाजपचे नेते शनिवारी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाला ट्रोल करत असलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत एखाद्या वक्तव्याचा लोकांचा विरोध असेल तर ते ट्रोलिंग म्हणून घेऊ नका असे म्हटले आहे.
तर त्यांच्या ट्विटर अकाउंट सुद्धा ट्विट करत याबदल त्यांचे मत मांडले आहेत. भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. हि मागणी करण्यापुर्वी त्यांनी 'आघाडी बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी. असे त्यांनी ट्विट केलं आहे.भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. हि मागणी करण्यापुर्वी त्यांनी 'आघाडी बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 3, 2020
गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टिका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती, त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टिका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहिये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये.— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 3, 2020
तर दुसऱ्या ट्विट मध्य त्यांनी "गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टिका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती, त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टिका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहिये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये." असं म्हटलं आहे. तर सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का ? असा प्रश्न हि त्यांनी यावेळी विचारलेला आहे.
सध्या गेल्या काही दिवसापासून फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर अनेक नेत्याच्या पोस्ट वर युजर्स कडून 'हाहा' हे रिऍक्ट जास्त येत आहेत सोबतच फेसबुक युजर्स अनेक नेत्यांना प्रश्न सुद्धा विचारताना दिसून येत आहेत.
कोणत्याही प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस करत नाही. जर दिलेल्या तक्रारी योग्य असतील तर कारवाई केली जाईल. पण आपल्या काळामध्ये काय चालायचं याचाही विचार करायला हवा, याची आठवण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी करुन दिली.
आज जागतिक हास्य दिन आहे. माझ्याकडून जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हसत रहा, हसवत रहा. 😀😁#WorldLaughterDay— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 3, 2020
यावेळी त्यांनी हास्य दिनाच्या शुभेच्छा देत आपले ट्विट क्लोज केले.