शुक्रवारी लंडनमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए 21 एस हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. यापूर्वी हा फोन काही लिक्समध्ये दिसला होता. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगने इन्फिनिटी-ओ डिस्प्ले, क्वाड कॅमेरा सेटअप आणि 5,000 एमएएच बॅटरी दिली आहे. सुरुवातीला हा फोन यूकेमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यानंतर Samsung Galaxy A21s हा स्मार्टफोन भारतासह इतर मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

A21s ची Price


सॅमसंग गॅलेक्सी A21s ची विक्री यूकेमध्ये 19 जूनपासून सुरू होणार असून त्याची सुरवातीची किंमत जीबीपी 179 (सुमारे 16,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. सध्या भारतात कधी उपलब्ध होईल याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट आणि ब्लु रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए 21 चे स्पेसिफिकेशन


या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाची एचडी + (720 x 1600 पिक्सल) इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 10 आधारित वन UI वर चालतो. यामध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. SD कार्डच्या मदतीने इंटर्नल मेमरी 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.


फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय येथे 8 एमपीचा अल्ट्रा-वाईड एंगल कॅमेरा, 2 एमपी डेपथ कॅमेरा आणि 2 एमपी मॅक्रो कॅमेरा देखील आहे. सेल्फीसाठी समोरील बाजूस 13 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए 21 एसची बॅटरी 5000 एमएएच आहे आणि तेथे 15w फास्ट चार्जिंगला सपोर्ट देतो सोबत यात मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आले आहे.