
देशात चालू असलेल्या लॉकडाऊन काळात इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे प्रमुख (आयसीए) अशोक मल्होत्रा आणि इतर तीन जण जूनियर क्रिकेट चैंपियनशिपमधील मुलांना ऑनलाइन प्रशिक्षणांद्वारे प्रशिक्षण देतील. यांचं उद्दीष्ट 8 ते 18 वर्षे वयोगटातील हुशार मुलांना शोधून त्यांना क्लब स्तरावरील क्रिकेटपर्यंत नेणे आहे. मंगळवारी हा कार्यक्रम ऑनलाइन सुरू करण्यात आला असून हे प्रशिक्षण सेव्हन थ्री स्पोर्ट्स या स्पोर्ट्स कंपनी चालिवण्यात येत आहे आणि यामध्ये माजी क्रिकेटर्स चेतन शर्मा, मल्होत्रा आणि सुरिंदर खन्ना यांच्यासह द्रोणाचार्य अवार्डी कोच डॉ. संजय भारद्वाज यांचा देखील समावेश आहे.
मुलांना शिकवण्यासाठी उत्सुक
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवडकर्ता मल्होत्रा म्हणाले की, "जेसीसीच्या माध्यमातून युवा क्रिकेटर्सना त्यांचे स्वप्न साकार करण्यास मदत करत असल्याने मला खूप आनंद झाला." तर भारद्वाज म्हणाले की, "जेसीसीमध्ये आमच्यासाठी मुलांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे आणि आम्ही क्रिकेट प्रशिक्षण, सराव आणि लाइव सामन्यांसाठी सुरक्षितता, स्वच्छता आणि विविध सुरक्षा च्या उपायांच्या प्रशिक्षणाबरोबरच क्रिकेटची नवी परिभाषा करू.
देशभरातील तीन विभागांमध्ये 8 ते 18 वयोगटातील मुलासाठी 100 खासगी क्लब तयार करण्याचे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे.