वाशिम, दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनांच्या यशोगाथा सांगणाऱ्या ‘दिशा परिवर्तनाची’ या माहितीपटाच्या डीव्हिडीचे विमोचन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते २९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती माया केदार व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्याची संकल्पना ही कल्याणकारी राज्याची असून राज्यातील जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने अनेक योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनेक योजना  प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत. त्याचे यशोगाथा ‘दिशा परिवर्तनाची’ या माहितीपटातून दाखविण्यात आल्या आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या लाभार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जातीच्या महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व साधनांचा पुरवठा, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, रमाई घरकुल योजना, मुलींना वसतिगृहाची सुविधा, मुला-मुलींना निवासी शाळांची सुविधा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजना, सामाजिक सभागृह, यामध्ये समावेश आहे.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता