संत ज्ञानेश्वर यांचा जन्म शके 1197 (इ.स. 1275) मध्ये आपेगाव या औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण जवळ गोदावरी नदीकाठी झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव विठ्ठलपंत होते तर ज्ञानेश्वरांच्या थोरल्या भावाचे नाव निवृत्तीनाथ होते तर धाकट्या भावंडांची नावे सोपानदेव आणि मुक्ताबाई असे होते. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रमात आल्याने त्यांना तत्कालीन धर्ममार्तंडाकडून छळ करण्यात आला.



ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरील टिका शके 1212 (इ.स.1290) मध्ये लिहिली. ज्ञानदेवांनी चांगदेव-पासष्टी, अमृतानुभव, हरिपाठ व स्फुट अभंगाची रचना केली. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी मराठी सारस्वता मधील अजोड व अजरामर कलाकृती ठरली आहे. तर ज्ञानेश्वरीतील ओवी संख्या सुमारे नऊ हजार असून भगवद्गीते प्रमाणे अठरा अध्याय आहेत.
ज्ञानेश्वरी ही मराठी भाषेत असल्याने समाजातल्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचली यामुळे अज्ञानाचा अंधकार दूर झाला ज्ञानेश्वरांनी सर्वांभूती समानता आणि ज्ञानयुक्त भक्ती यांची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांनी उच्चवर्णीय ते शूद्रातिशूद्र लोकांना भागवत धर्म द्वारे एकत्र आणले आणि समानतेच्या तत्त्वाचे पालन केले. यासाठी त्यांनी धर्म श्रद्धेला उच्च नैतिक विचारांची बैठक दिली व अदेत्व तत्वज्ञानाचा आधार घेतला ज्ञानेश्वरी च्या शेवटी नाथ संप्रदायाची गुरुपरंपरा सांगितले आहे.

आदिनाथ- मत्सेन्द्रनाथ- गोरक्षनाथ- गहिनीनाथ- निवृत्तीनाथ- ज्ञानेश्वर

भावार्थदीपिका याठिकाणी ग्रंथाचे कार्य अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा येथे ज्ञानेश्वरांनी केली.

ज्ञानदेवांनी वयाच्या एकविसाव्यावर्षी आळंदी येथे इंद्रायणी काठी संजीवन समाधी घेतली.