भारतामध्ये मागील काही दिवसांमध्ये TikTok आणि 58 app बंद करण्यात आले आहेत आणि टिकटोक सारखेच बरेच app सध्या प्ले स्टोअर वर नवनवीन येत आहेत यामध्ये काही अँप भारतातील आहेत तर काही भारताबाहेरील. यामध्ये फेसबुकने आता नवीन निर्णय घेतलेला आहे त्यांनी टिक टोक सारखा अँप जो बनवला होता तो ॲप आता बनवणार नाहीत.



Facebook ने Lasso नावाचा एक्सपेरिमेंटल ॲप लॉन्च केला होता जो टिक टॉक सारखाच काम करत होता. परंतु भारतामध्ये सध्या हा लॉन्च करण्यात आला नव्हता पण आता कंपनी या महिन्यांमध्ये या अॅप ला बंद करत आहे.

टिक टॉक सारखे Lasso ऍपला बंद करणे म्हणजे फेसबुक ने टिक टोक समोर हार मानली असे नाही तर कंपनीने टिक टॉक सारखा नवीन ॲप वर काम करत आहे तर फेसबुक ने अलीकडेच इंस्टाग्राम Reels लॉन्च केला आहे याला टिक टोक ते प्रतिद्वंदी मानलं जात आहे

फेसबुक ने Lasso सोबत Hobbi app ला
सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर हॉबी app Pinterest सारखं चालायचं या दोन्ही app ना कंपनीने एक्सपेरिमेंटल अँप म्हणून लॉन्च करण्यात आलं होतं ते आता बंद करण्यात येणार आहे
इंस्टाग्राम मधील Reels याला एका फिचर सारखे लॉन्च करण्यात आलेला आहे म्हणजेच कंपनीने आतातरी पूर्ण स्पेशल ॲप लॉन्च केलं नाही या फिचर मधून इंस्टाग्राम वर युजर छोटे छोटे व्हिडिओ शूट करून त्यांना म्युझिक सुद्धा लावू शकतात

केवळ फेसबुक नाहीतर गुगल आणि युट्युब सुद्धा टिक टॉक सारखा प्लॅटफॉर्म त्यांच्या युजरपर्यंत पोहचवू इच्छित आहेत अलीकडेच युट्युबसुद्धा यासारखेच फिचर लॉंच केले आहे ज्यामध्ये शॉर्ट व्हिडीओज अपलोड केले जाऊ शकतात.