समाधी स्मारकाच्या दुसऱ्या टप्यासाठी पाठपुरावा करु – श्री.विजय वडेट्टीवार

कोल्हापूर, दि. 3 : राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळास आणि समाधीस्थळास भेट देऊन शाहुंच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज भेट देऊन राजर्षी शाहुंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाची पाहणी केली.

समाधी स्मारकाच्या दुसऱ्या टप्यासाठी पाठपुरावा करु – श्री. वडेट्टीवार

यानंतर मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सिध्दार्थनगर येथील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या समाधी स्थळास भेट देऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना राजर्षी शाहू छत्रपती समाधी स्मारकाच्या उभारणीबाबतची माहिती महापौर निलोफर आजरेकर आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिली. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या समाधी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील उभारणीसाठी शासन कटिबध्द असून या समाधी स्मारकांच्या 8 कोटी 27 लाखाच्या दुसऱ्या टप्प्यातील उभारणीच्या प्रस्तावाचा शासनस्तरावर पाठपुरावा करुन आवश्यक निधी उपलब्ध करुन  देण्यात पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रातांधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शितल मुळे-भामरे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेवक मोहन सालपे, नगरसेवक सुभाष बुचडे, नगरसेवक डॉ. सदिप नेजदार, संजय लाड, सागर येवलुजे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, विविध विभागांचे अधिकारी आणि शाहुप्रेमी नागरिक उपस्थित होते. 


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता