
मुंबई दि. १८ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५४६ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २८७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. १७ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-
■ व्हॉट्सॲप- २०६ गुन्हे
■ फेसबुक पोस्ट्स – २३० गुन्हे दाखल
■ टिकटॉक व्हिडिओ- २८ गुन्हे दाखल
■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १८ गुन्हे दाखल
■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे
■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ६० गुन्हे दाखल
■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २८७ आरोपींना अटक.
■ ११८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
■ बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे या विभागातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या १७ वर.
■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात एका व्यक्ती विरुद्ध बदनामीकारक राजकीय आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवर पोस्ट केली होती.त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
०००००
वि. सं.अ- डॉ. राजू पाटोदकर
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता