सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 5 : जिल्हा कोविड रुग्णालयाच्या जिल्हास्तरीय समिती स्थापण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, विविध सुविधांद्वारे सेवेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होत आहे. कोविड रुग्णालयात आता सीसीटीव्ही कॅमेरे, मदत कक्ष आदी सुविधा उभारण्यात येत असून, त्यादृष्टीने प्रशासनाने अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज दिले. मदत कक्षाद्वारे रुग्णांच्या आप्त व नातेवाईकांना त्यांची विचारपूस करण्याची सुविधाही निर्माण करण्यात येणार आहे. 

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय पद्धती अंमलात आहे. कोरोनाच्या लक्षणांनुसार रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते. अमरावतीत सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जिल्हा कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याद्वारे रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी  जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याद्वारे आरोग्य विभागाने नुकताच शासन निर्णयही जाहीर केला आहे. त्यानुसार या समितीने  कोरोना रुग्णालयांना नियमित भेटी द्याव्यात व उपचार व सुविधांबाबत वेळोवेळी तपासणी करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. 

कोरोना रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला आहे. ज्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत. रुग्णालयांच्या भेटी दरम्यान समितीला सीसीटिव्ही चित्रीकरण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. तशी व्यवस्था व्हावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. उपचार घेत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना बोलता येईल यासाठी रुग्णालयात सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाला रुग्णालयाच्या आवारात प्रवेश द्यावा व नातलगाला थांबता येईल अशी जागा रुग्णालयात तयार करावी. कोरोना रुग्णालयांनी मदत कक्ष तयार करावा जेथे रुग्णांचे नातेवाईक प्रत्यक्ष येऊन किंवा दूरध्वनीद्वारे उपचार घेत असलेल्या आप्ताची विचारपूस करू शकतील. मात्र, याची अंमलबजावणी करताना पुरेशी दक्षता घेतली जावी, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

कोरोनाच्या रुग्णांची काळजी व्यवस्थित घेतली जावी त्यांना मिळणारे उपचार, कोरोनासाठी असलेल्या रुग्णालयांमधील सुविधा यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.  जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव आहेत. जिल्ह्यातील महापालिका आयुक्त हे समिती सदस्य असून जिल्ह्यात असलेल्या शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी  किंवा हृदयविकार तज्ज्ञ किंवा त्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले जागतिक आरोग्य संघटनेचे क्षयरोग सल्लागार, जिल्ह्यातील शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यातील सामान्य औषधी विभागाचे प्रमुख, इंडियन मेडीकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

कोरोना रुग्णालयांना भेटी देऊन तेथील सुविधेची पाहणी करणे, भेटी दरम्यान समिती सदस्य विलगीकरण कक्ष, आयसीयु यांना भेटी देऊन रुग्णाला देण्यात येत असलेल्या उपचाराची माहिती घेऊन कागदपत्रांची पाहणी करणे, अचानक भेटी देणे व नियमितपणे शासनाला अहवाल देणे, ही समितीची जबाबदारी आहे. त्यानुसार नियमित अंमलबजावणी करत रुग्णालयातील सेवेचा दर्जा उंचावण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

कोविड रुग्णालयाच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती - Jeevan Marathi News


जिल्ह्यात भाजीपाला, फळ, फूल पिकांचे क्षेत्र वाढवा : कृषीमंत्री दादाजी भुसे - Jeevan Marathi News


कोरोना रोखण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब - Jeevan Marathi News


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण - Jeevan Marathi News


राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दर ५४ टक्क्यांवर कायम - Jeevan Marathi News


राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ६७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ - Jeevan Marathi News


लॉकडाऊनच्या काळात ५२० सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक - Jeevan Marathi News


राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय - Jeevan Marathi News


वनमंत्री व कृषीमंत्र्यांच्या हस्ते बांबू व सागवानच्या रोपांचे वाटप - Jeevan Marathi News

वाचा सविस्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा - Jeevan Marathi News


राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ३ लाख ९३ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप – मंत्री छगन भुजबळ - Jeevan Marathi News


शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी तंत्रज्ञान पोहोचवा – कृषीमंत्री दादाजी भुसे - Jeevan Marathi News


ABP  Majha: संजय राऊत यांनी 12 आमदारांची चिंता करू नये तर महाराष्ट्राची काळजी करावी : देवेंद्र फडणवीस.


Zee २४ तास: धक्कादायक! पुण्यातील महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित |.


ABP  Majha: अर्शद वारसीला एक लाखाचे लाईटबिल, म्हणाला, 'अदानी हायवेवरचा लुटारु' नंतर ट्विट केलं डिलिट!.





सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता