
मुंबई, दि. १ :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज बुधवार, दि. 1 जुलैला विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी वनमंत्री संजय राठोड, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव.रविंद्र जगदाळे, विधानपरिषद सभापतींचे सचिव महेंद्र काज आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.नाईक यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता