शासनाचे नियम व स्वयंशिस्त पाळा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

शिर्डी, दि.05 :  कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. हे संकट अजून संपलेले नाही. लॉकडाऊनमधील शिथिलता ही पूर्णपणे मोकळीक नसून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याबरोबरच स्वयंशिस्त पाळावी. जे नागरिक नियम पाळत नाही त्यांना प्रशासनाने नियम पाळण्यास भाग पाडावे. कोरोना रोखण्यासाठी संगमनेरमध्ये ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावी, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या.

संगमनेर येथे कारखाना कार्यस्थळावर कोरोना उपाययोजनांबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम, डॉ.हर्षल तांबे, डॉ.सचिन बांगर, सुरेश शिंदे, पोलीस निरिक्षक अभय परमार, डॉ.सुरेश घोलप, डॉ.संदिप कचोरिया आदि यावेळी उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री.थोरात म्हणाले, कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील तीन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. 75 दिवसानंतर राज्यात मिशन बिगीनअंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांनी ही पूर्णपणे मोकळीक नाही हे लक्षात घ्यावे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसून काही भागात संक्रमणातून वाढू पाहत आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी शासनाने जारी केलेल्या नियमांबरोबर प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. हा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियम पाळण्याची सवय लावावी. संगमनेरमध्ये टेस्टिंग वाढविण्यात आल्या असून ‘थ्री टी’ फॉर्मुल्यानुसार ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच या संकटात कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. असे आवाहन करतांना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार डॉ.तांबे म्हणाले, संगमनेरमध्ये प्रत्येक नागरिकांनी कोरोना योद्धा म्हणून काम करतांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, मास्कचा वापर याबरोबरच स्वत: मधील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पालेभाज्यांचा समावेश असलेला सकस आहार घ्यावा. प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद असून नागरिकांनी गर्दी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी प्रांतधिकारी शशिकांत मंगळूरे यांनी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

कोविड रुग्णालयाच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती - Jeevan Marathi News


जिल्ह्यात भाजीपाला, फळ, फूल पिकांचे क्षेत्र वाढवा : कृषीमंत्री दादाजी भुसे - Jeevan Marathi News


कोरोना रोखण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब - Jeevan Marathi News


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण - Jeevan Marathi News


राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दर ५४ टक्क्यांवर कायम - Jeevan Marathi News


राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ६७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ - Jeevan Marathi News


लॉकडाऊनच्या काळात ५२० सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक - Jeevan Marathi News


राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय - Jeevan Marathi News


वनमंत्री व कृषीमंत्र्यांच्या हस्ते बांबू व सागवानच्या रोपांचे वाटप - Jeevan Marathi News

वाचा सविस्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा - Jeevan Marathi News


राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ३ लाख ९३ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप – मंत्री छगन भुजबळ - Jeevan Marathi News


शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी तंत्रज्ञान पोहोचवा – कृषीमंत्री दादाजी भुसे - Jeevan Marathi News


ABP  Majha: संजय राऊत यांनी 12 आमदारांची चिंता करू नये तर महाराष्ट्राची काळजी करावी : देवेंद्र फडणवीस.


Zee २४ तास: धक्कादायक! पुण्यातील महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित |.


ABP  Majha: अर्शद वारसीला एक लाखाचे लाईटबिल, म्हणाला, 'अदानी हायवेवरचा लुटारु' नंतर ट्विट केलं डिलिट!.





सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता