अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई, दि. 9 : राज्यात दि. 1 जुलै ते दि. 8 जुलै पर्यंत 857 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 7 लाख 86 हजार 729 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 7 लाख 86 हजार 729 आणि असे एकूण दि. 1 एप्रिल ते दि. 8 जुलै या कालावधीत 97 लाख 66 हजार 258 शिवभोजन थाळ्या वाटप करण्यात आल्या आहेत.

00000


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता