(दि. ५ जुलै ते ११ जुलै २०२० या कालावधितील शासनाचे विविध निर्णय आणि इतर घडामोडींचा संक्षिप्त आढावा).

कोरोना युद्ध

५ जुलै २०२०

  •  ६५५५ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ८६ हजार ४० रुग्णांवर उपचार सुरू. ३६५८ रुग्णांची  घरी रवानगी, बरे होऊन घरी परतलेले रुग्ण- १ लाख ११ हजार ७४०. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  १२ हजार ४४२ नमुन्यांपैकी २ लाख ६ ६१९ नमुने पॉझिटिव्ह (१८.५७ टक्के),  आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ४.२७ टक्के.
  • सायबर संदर्भात ५२०  गुन्हे दाखल, २७३ व्यक्तींना अटक.
  • भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद- यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सहभागी, ठळक मुद्दे- उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल पण कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका. एप्रिल अखेरीपासून ग्रीन आणि ऑरेंज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना अटी आणि शर्तींच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी. अनेक उद्योग सुरु, कामगारही रुजू. मालवाहतुकीला थांबवलेले नाही. जिथे उद्योग सुरु झाले आहेत तिथे आरोग्यदायी व सुरक्षित वातावरणासाठी व्यवस्थापन आणि कामगार यांच्या कोविड दक्षता समित्या स्थापन करू शकतो का ते पाहिले पाहिजे.
  • राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची बैठक. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित. हॉटेल व्यवसाय सुरु करण्याबाबतची कार्यपद्धती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरेंट सुरु करण्याचा विचार असल्याचे श्री ठाकरे यांच्याकडून स्पष्ट.
  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत १९५  विमानांनी ३०,०८३  नागरिक मुंबईत दाखल, मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ८८०, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १०३११, इतर राज्यातील ८८९२ प्रवासी.
  • सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल व मेडीकल रिसर्च सेंटर आणि केएलईएस कॅन्सर हॉस्पीटल या दोन रुग्णालयांचा समावेश, त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याची आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांची माहिती.
  • 1 ते 4 जुलैपर्यंत 3 लाख 93 हजार 924 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • 1 ते 4 जुलैपर्यंत 9 लाख 15 हजार 201 शिधापत्रिका धारकांना 67 हजार 830 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.

6 जुलै 2020 

  • ३५२२ रुग्णांची घरी रवानगी, आतापर्यत बरे होऊन घरी परतेलेल्या रुग्णाची संख्या १ लाख १५ हजार २६२, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ टक्के, आज कोरोनाच्या ५३६८ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ८७ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ३५ हजार ४४७ नमुन्यांपैकी २ लाख ११ ९८७ नमुने पॉझिटिव्ह (१८.६७ टक्के), आज २०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ४.२६ टक्के.
  • मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे महापालिकेला वीस रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि दहा कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुपूर्द. ठळक मुद्दे- समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. कोरोनाशी लढा देताना टाटा समुहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहेत. आपण कोरोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होणार आहोत.
  • स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या  http://mahajobs.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण. उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे सहभागी. ठळक मुद्दे- या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा. उद्योजक आणि राज्यातील युवकांना काही अडचणी येत असतील तर त्याचा अभ्यास केला जावा.  बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे हे पोर्टल व्हावे, उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ मिळावे तर युवकांना रोजगार. या समन्वयातून  राज्याचा विकास होताना घराघरात समाधान नांदावे अशी अपेक्षा. कोरोनामुळे परराज्यातील अनेक कामगार त्यांच्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे नोकऱ्या उपलब्ध होत आहेत पण कामगार नाहीत अशी स्थिती एकीकडे आहे तर दुसरीकडे काही उद्योग  कामगार कपात करत आहेत, उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन तत्पर आहे. अशावेळी कामगार कपात करणे योग्य नाही. उद्योग विभागाने या सर्व उद्योजकांशी बोलून त्यांच्या अडचणी सोडवण्याबाबत आश्वस्त करावे.
  • मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी लोकार्पण केलेल्या “महाजॉब्स” या संकेतस्थळावर अवघ्या चार तासात सुमारे १३३०० हून अधिक नोकरी इच्छुक तर १४७ उद्योजकांची नोकरभरतीसाठी नोंदणी.  
  • राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळून हॉटेल, लॉज, अतिथी गृहांना 8 जुलै पासून क्षमतेच्या 33 टक्के सेवा देण्यास शासनाची परवानगी
  • 1 जुलै ते 5 जुलै पर्यंत 13 लाख 11 हजार 275 शिधापत्रिका धारकांना 1 लाख 22 हजार 90 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • 1 जुलै ते दि . 5 जुलै पर्यंत 855 शिवभोजन केंद्रातून 4 लाख 88 हजार 622 शिवभोजन थाळ्यांचे वाटप
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात १ लाख ५१ हजार गुन्हे दाखल,   २९,६३५ व्यक्तींना अटक, अत्यावश्यक सेवेसाठी  ५ लाख ६० हजार ७५ पासेसचे  पोलीस विभागामार्फत वितरण, पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २९४ घटना, त्यात ८६१ व्यक्तींना ताब्यात, अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल, ८८,३३० वाहने जप्त. 
  • सायबर संदर्भात ५२२  गुन्हे दाखल, २७३ व्यक्तींना अटक.
  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत २०१  विमानांनी ३०,८१६  नागरिक मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ९७५, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १०५०१, इतर राज्यातील  ९३४० प्रवासी.

७ जुलै २०२०

  •  २२ मार्च ते ६ जूलै  या कालावधीत  १,५४,४५२ गुन्ह्यांची नोंद, २९,७९२ व्यक्तींना अटक, अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल,८८,७५७ वाहने जप्त.
  • कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सिडकोच्या सहाय्याने मुलुंड येथे, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहीसर, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नमन समूहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्स येथे आणि बीकेसी येथील १२० खाटांचे आयसीयू अशा ३ हजार ५२० बेड्सच्या जम्बो सुविधांचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत लोकार्पण. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनग जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित. ठळक मुद्दे-  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम मोकळ्या मैदानावरील रुग्णालये ही संकल्पना आणली. अशा रुग्णालयांमध्ये आयसीयू सुरू करण्याची विक्रमी कामगिरी देशासमोर ठेवली. ह्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यांचा दर्जा राखला गेला. त्याची उभारणी एखाद्या कायमस्वरुपी रुग्णालयाइतकीच भक्कमपणे झाली. भविष्यात अशाप्रकारे सांसर्गिक आजारांवर उपचारासाठी कायमस्वरुपी सोय होण्याच्या दृष्टीने मुंबई आणि परीसरात रुग्णालये उभारणीचे काम हाती घ्या. सुविधामुलुंड-  १६५० खाटांच्या कोरोना रुग्णालयात १००० खाटा ऑक्सिजन सोयींनीयुक्त असून ६५० खाटा विलगीकरणासाठी, ५०० खाटा ठाणे महापालिकेसाठी. दहिसर –  ९५५ खाटांचे रुग्णालयात १०८ खाटांचे आयसीयू, २०० खाटा मीरा-भाईंदर महापालिकेसाठी राखीव, महालक्ष्मी रेसकोर्स– ६०० खाटा
  • मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात   गैरप्रकार करणाऱ्या  29  स्वस्त धान्य दुकानदारांवर दक्षता पथकाकडून कारवाई. लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत आतापर्यंत 13 शिधावाटप दुकानांवर निलंबनाची 44 दक्षता पथकामार्फत कारवाई, 4 शिधावटप दुकाने रद्द, 12 शिधावाटप दुकानांवर गुन्हा दाखल.
  • 1 जुलै ते 6 जुलै पर्यंत 857 शिवभोजन केंद्रातून 5 लाख 88 हजार 469 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • 1 जुलै ते 6 जुलै पर्यंत 17 लाख 48 हजार 971 शिधापत्रिका धारकांना 1 लाख 89 हजार 600 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • दुकानांमध्ये होणारी गर्दी नियंत्रीत तथा कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील दुकाने तथा मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तासाचा कालावधी वाढवून देण्याचा निर्णय, कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली  ठेवण्यासाठी ९ जुलैपासून संमती. मिशन बिगिन अगेन टप्पा ५ अंतर्गत यासंदर्भातील आदेश निर्गमित.
  •  रुग्ण बरे होण्याचा दर ५४ टक्क्यांवर कायम, ३२९६ रुग्णांची घरी रवानगी, बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या- १ लाख १८ हजार ५५८, कोरोनाच्या ५१३४ रुग्णांचे निदान, सध्या ८९ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख  ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के). आज २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते व कृषीमंत्री श्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत महाडीबीटी पोर्टलचा शुभारंभ.ठळक मुद्दे–  या पोर्टलमुळे शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. शेतीक्षेत्रात बाजारपेठ संशोधन महत्वाचे असल्याने जे विकेल तेच पिकेल या पद्धतीने पिकांचे नियोजन करून शेतकऱ्यांना एका छताखाली आणा. यासाठी विभागवार पद्धतीने पिकांचे नियोजन करा, महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ मिळणार. विकसीत तंत्रज्ञानाची जोड प्रयोगशील शेतकऱ्याला दिली तर कमी जागेत भरपूर उत्पादन घेणे शक्य.  विषमुक्त शेती उत्पादनासाठी पुढाकार घेतल्यास शासनामार्फत आवश्यक सहकार्य, सेंद्रीय शेतीतून उत्पादित शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य, शेतकरी नवीन उपक्रम राबवित असतील तर त्याला प्रोत्साहन. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीवर आधारीत २३ हजार ५०६ गावांमध्ये कृषी संजिवनी कार्यक्रम आयोजित.

८ जुलै २०२०

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत  पीएचडी किंवा एमफिलचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती यावर्षी (BANRF – 2018) लेखी व तोंडी परीक्षेद्वारे निवडलेल्या केवळ १०५ विद्यार्थ्यांना न देता परीक्षेस पात्र सर्व ४०८ विद्यार्थ्यांना देण्याचा सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांचा निर्णय.
  • दीड महिन्यांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ येथील कोरोनामुक्त झालेल्या एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्यावतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आल्यानंतर या घटनेची दखल घेत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नांदगावपेठला भेट व संबंधित महिलेस दिलासा.
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात १ लाख ५५ हजार गुन्हे दाखल. २९,७९३ व्यक्तींना अटक.
  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत २१४  विमानांनी ३२ हजार ३८३ नागरिक मुंबईत दाखल. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ११ हजार ३०५, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ११०९२, इतर राज्यातील ९९८६ प्रवासी.
  •  मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेअंतर्गत भांडूप येथे दक्षता पथकामार्फत 15 लाख 60 हजार  550 रुपयांचा मुद्देमाल जप्त, यामध्ये 17500 कि.ग्रॅ तांदूळ आणि 1800 कि.ग्रॅ. गव्हाचा समावेश.
  • जुलै महिन्यात आतापर्यंत 2 लाख 91 हजार 10 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • जुलै महिन्यात आतापर्यंत 6 लाख 86 हजार 967 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.

मंत्रिमंडळ निर्णय

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या मागणीत मोठया प्रमाणात घट झाल्यामुळे अतिरिक्त दूधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याच्या योजनेला 31 जुलै 20 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय.
  • शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये करण्याबाबत निर्णय.
  • कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याचा निर्णय.
  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 2020-21  साठी अर्थसंकल्पित 7 हजार कोटी रुपये या निधीतून यापूर्वी वितरीत केलेले निधी वगळून 1 हजार 306 कोटी रूपये वितरीत करण्यास मान्यता. आतापर्यंत 25.77 लाख खातेदारांना  16 हजार 690 कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आल्याची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती.
  • कोरोनाच्या ४६३४ रुग्णांची घरी रवानगी, बरे होऊन घरी परतलेल्या व्यक्ती- १ लाख २३ हजार १९२. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.०६ टक्के. आज ६६०३ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ९१ हजार ६५ रुग्णांवर उपचार सुरू. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ९१ हजार ५४९ नमुन्यांपैकी २ लाख २३ ७२४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७७ टक्के). आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ४.२२ टक्के.

९ जुलै २०२०

  • 1 जुलै ते 8 जुलै पर्यंत 7 लाख 86 हजार 729 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • 1 जुलै ते 8 जुलै पर्यंत 31 लाख 4 हजार 265 शिधापत्रिका धारकांना 4 लाख 23 हजार 820 क्विंटल अन्नधान्याचे वाटप
  • मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याद्वारे ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक व कोरोना परिस्थितीचा आढावा. ठळक मुद्दे-  ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक. कोरोनाची एकांगी लढाई लढू नका, शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्थाना  सहभागी करून घ्या. सूचना आणि निर्देश स्वयंस्पष्ट असतात. याप्रमाणे आयुक्तांनी बारकाईने लक्ष घालून कारवाई करणे शक्य. मार्च पासून जुलै पर्यंतच्या कालावधीत जम्बो सुविधा उभारण्यावर भर. मुंबईमध्ये ज्या रीतीने सुविधा निर्माण झाल्या आहेत तशा महानगर क्षेत्रात होणे अपेक्षित पण पाहिजे तेवढ्या सुविधा उभारलेल्या दिसत नाहीत. येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने या सुविधा उभारणे सुरु करा. मोठे उद्योग, कंपन्या, संस्था यांची मदत घ्या. वाड्या, वस्त्या, कॉलनीजमध्ये नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या बनवा. स्वयंसेवी संस्था , युवकांना यात सहभागी करून घ्या. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांना दुसरे काही आजार आहेत का तसेच त्यांची ऑक्सिजन पातळीबरोबर आहे का , परिसरात कुणाला आजार आहेत का, स्वच्छता  नियमित केली जाते का, लोक मास्क घालतात का  बाबतीत नागरिकांच्या समित्याची मदत होईल.
  • मुंबईतील झोपडपट्टी भागात कोरोना संसर्ग थांबविणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारावर उपचार करण्यासंदर्भात मुंबई महापालिका अधिकारी आणि स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद. ठळक मुद्दे-बृहन्मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करताना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय युनिट स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी  वॉर्डनिहाय या समित्यांची नोंदणी  करावी, नागरिक आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करणारी स्वंयसेवी संस्थांची ही  यंत्रणा मुंबईत कायमस्वरूपी कार्यरत राहावी, चेस द व्हायरसचे काम महापालिका करत आहेच ते ज्या ठिकाणी काम करत आहेत ती ठिकाणी सोडून इतर ठिकाणी ही संकल्पना स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवा, कोरोना आणि पावसाळ्यातील आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छता, मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सूचनांचे पालन या संस्थांनी  नागरिकांकडून करून घ्यावे, त्यासाठी या संस्थांनी जनजागृती करावी. पावसाळ्यातील साथीचे आजार दूर ठेवण्यासाठी या संस्थांच्या सहकार्याने रस्ते, बांधकामाधीन इमारती, पूल याठिकाणी निर्जंतुकीकरण, धूर फवारणीचे काम करा,  दिवसातून सहा वेळा सार्वजनिक शौचालयांचे निर्जुंतूकीकरण केल्याने धारावीसारख्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणता आला. अशाच पद्धतीने डासांचे निर्मुलन करण्याकरिता आवश्यक धूर फवारणी करणे आवश्यक, त्यासाठी महापालिकेने आवश्यक फवारणी यंत्रे स्वंयसेवी संस्थांना द्यावीत, कोराना प्रतिबंधक काम करताना स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी वाड्या वस्त्या, झोपडपट्टयांमध्ये जाऊन तपासणी करत आहेत. महापालिकेने त्यांना सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करून द्यावीत.
  • मुंबई महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी नेमण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक. ठळक मुद्दे-  शासनाने मुंबईतील ३५ खासगी रुग्णालयातील ८० बेडस् ताब्यात घेतले.  शिवाय काही अधिकाऱ्यांना महापालिकेच्या रुग्णालयांची जबाबदारी सोपविल्याने कामकाजात सुसूत्रता येऊन रुग्णांना सुलभतेने बेडस् मिळणे सुलभ, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा महापालिकडे असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या असल्यातरी त्याचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने झाला पाहिजे. ज्या खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेडस् ताब्यात घेतले आहेत अशा रुग्णालयांनी सध्या किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत, किती बेडस् रिक्त आहेत याची यादी बेडसच्या क्रमांकासह दररोज रुग्णालयाच्या दरवाजावर लावावी, रुग्णवाहिकांना मार्गदर्शन करावे म्हणजे कुठल्या रुग्णालयात बेडस् रिक्त आहेत याची तत्काळ माहिती मिळेल. मुंबईत मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका आहेत त्यांचे नियंत्रण करणारी यंत्रणा तयार केल्यास नागरिकांना तत्काळ सेवा मिळेल. छोट्या खासगी रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णांवर उपचारासाठी आता प्रयत्न आवश्यक.
  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत २१७ विमानांनी ३२ हजार ८२३  नागरिक मुंबईत दाखल. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११ हजार ४०२, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ११ हजार २२३, इतर राज्यातील प्रवाशांची संख्या १० हजार १९८.
  • कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर फिरणाऱ्या चुकिच्या संदेश/माहितीपासून सावधानता बाळगण्याचे, महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन.
  • सायबर संदर्भात ५२८  गुन्हे दाखल, २७३ व्यक्तींना अटक.
  • लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते ८ जूलै  या १,५६,२९९ गुन्ह्यांची नोंद, २९,७९३ व्यक्तींना अटक.
  • 1 जुलै ते 8 जुलै पर्यंत 31 लाख 4 हजार 265 शिधापत्रिका धारकांना 4 लाख 23 हजार 820 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • 1 जुलै ते 8 जुलै पर्यंत 7 लाख 86 हजार 729 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • कोरोना विषाणुचा ग्रामीण भागात होत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत जिल्हा परिषदांतर्गत सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी तथा कामगार यांना पुढील ३ महिन्यांसाठी ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय.
  • राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू माणूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय शासनाने घेतला  असल्याची, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांची माहिती.
  • गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड यांची  पत्रकार परिषद.  ठळक मुद्दे-  कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बांधकाम उद्योगाला उभारी देण्यासाठी व रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी स्ट्रेस फंडाची निर्मिती, त्याचा फायदा मुंबईतील विकासकांना आणि झोपडपट्टीतील रहिवाशांना होणार, सध्या अभियांत्रिकी योजनेच्या मंजुरीच्या 6 टप्प्यांची नस्तीची तपासणी तीन टप्प्यावर. मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ऑटो डीसीआर संगणकीय प्रणालीच्या अंमलबजावणीला लवकरच सुरुवात, त्यामुळे पारदर्शकता व गतीने मंजुरी देणे शक्य. यापुढे  देखभाल शुल्क एकदाच घेण्यात येईल. कोणत्याही पुनर्वसन प्रकल्पाला स्थगिती नाही. विकासकांना भरावयाच्या विविध शुल्कासाठी असलेल्या मुदतीस पुढील 9 महिन्यांकरता वाढ. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी बँक गॅरंटी चा दर सर्व योजनांसाठी बांधकाम खर्चाच्या 2 टक्के राहील.
  • गेल्या नऊ दिवसात  बऱ्या झालेल्या ३४ हजार १०५ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१९ टक्के, आज ४०६७ रुग्णांची  घरी रवानगी, बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १ लाख २७ हजार २५९,  आज ६८७५ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख  २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के). आज २१९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या मृत्यूदर ४.१९ टक्के.
  • गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये होणारे मोठ्या प्रमाणावरील गाळप, हंगामात सुरू होणारे साखर कारखाने, त्यांना पूर्व हंगामी/ अल्प मुदतीचे कर्ज मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी याबाबत सहकार व पणन मंत्री  बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. निर्देश–  साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यासाठी लागणारे कर्ज तातडीने मिळवून द्या. कारखान्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करा.
  • घाऊक विक्रेत्यांकडून नवीन मद्यसाठा खरेदी करून सीलबंद बाटलीमध्ये विकण्याची परवानगी, १५ हजार २०० अनुज्ञप्ती व त्यावर अवलंबित १ लाख मनुष्यबळास दिलासा

१० जुलै २०२०

  • वंदेभारत अभियानांतर्गत २२४ विमानांनी ३३ हजार ९७७ प्रवासी आतापर्यंत मुंबईत दाखल, मुंबईतील प्रवाशांची संख्या ११ हजार ८८१, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ११ हजार ६२३. इतर राज्यांचे १० हजार ४७३ प्रवासी.
  • 1 जुलै ते 9 जुलै पर्यंत 40 लाख 50 हजार 32 शिधापत्रिका धारकांना 5 लाख 81 हजार 780 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • 1 जुलै ते दि . 9 जुलै पर्यंत 8 लाख 87 हजार 560 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • सायबर संदर्भात ५३०  गुन्हे दाखल़, २७४ व्यक्तींना अटक.
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे २२ मार्च ते ९ जूलै  या कालावधीत १,६१,८२१ गुन्ह्यांची नोंद, २९,९९० व्यक्तींना अटक.
  • आज ५३६६ रुग्णांची घरी रवानगी,  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के, बरे होऊन घरी परतलेले रुग्ण- १ लाख ३२ हजार ६२५, आज ७८६२ नवीन रुग्णांचे निदान, ९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख  ५३ हजार ९७८ नमुन्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०१ टक्के). आज २२६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ४.१५ टक्के.
  • 15 मे पासून  आतापर्यंत 31 लाख 55 हजार  813 ग्राहकांना  घरपोच मद्यविक्री सेवा, मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, 10,791 किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पैकी 7,933 अनुज्ञप्ती सुरू. 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी. 15 मे 2020 पासून घरपोच मद्य विक्री. https://ift.tt/2FkHlJZ या संकेतस्थळावर ऑनलाइन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा. 1 एप्रिल 2020  ते 30 जून 2020 या काळात 1 लाख 43 हजार 656 मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी ग्राहकांचे अर्ज; यापैकी 1 लाख 38 हजार 497 परवाने मंजूर.
  • 24 मार्च पासून 9 जुलै  2020 पर्यंत लॉकडाऊन काळात अवैध मद्यविक्री संदर्भात 10,735  गुन्ह्यांची नोंद, 5,297  आरोपींना अटक.  940  वाहने जप्त,  28 कोटी 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक.ठळक मुद्दे- गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात (कॉरटाइन) चौदा दिवसांऐवजी सात दिवस ठेवणे, कोकणात गणेशोत्सवासाठी  येताना टोल माफीची सुविधा, पासेसची व्यवस्था, प्रवासाचे नियोजन, कोविड-19 तपासणीचा शासनामार्फत खर्च, या  विषयांवर सविस्तर चर्चा.   कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेतली जाणार.

११ जुलै २०२०  

  • 1 जुलै ते 10 जुलै पर्यंत 859 शिवभोजन केंद्रातून 9 लाख 88 हजार 149 शिवभोजन थाळ्यांचे वाटप. महिना निहाय तपशील-   एप्रिल – 24 लाख 99 हजार 257, मे – 33 लाख 84 हजार 40, जून – 30 लाख 96 हजार 232.
  • 52 हजार 426 स्वस्त धान्य दुकानांमधून  1 जुलै ते 10 जुलै पर्यंत 50 लाख 68 हजार 471 शिधापत्रिका धारकांना 7 लाख 50 हजार 650 क्विंटल अन्नधान्याचे वाटप. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 4 लाख 22 हजार 683 क्विंटल गहू, 3 लाख 27 हजार 970 क्विंटल तांदूळ, तर 4 हजार 233 क्विंटल साखरेचे  वाटप. स्थलांतरीत परंतु लॉकडाऊनमुळे अडकलेल्या 1 लाख 12 हजार 651 शिधापत्रिका धारकांकडून   पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ते ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी अन्नधान्याची उचल.      प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना  –    आतापर्यंत 1 कोटी 38 लाख 87 हजार 294 रेशनकार्डांवरील  6 लाभार्थ्यांना  31 लाख 40 हजार 910 क्विंटल मोफत तांदूळ वाटप.  कोविड-19 संकटावरील  उपाययोजना-  3 कोटी 8 लाख 44 हजार 76 एपीएल केसरी लाभार्थी-  (प्रती व्यक्ती 5 किलो धान्य ,गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) 13 लाख 4 हजार 46 क्विंटल धान्य वाटप.  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना- (प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत तूर किंवा चणा डाळ)  – 3 लाख 63 हजार 987 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप. 
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून  २२ मार्च ते १० जूलै  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,६४,१६० गुन्ह्यांची नोंद,  ३०,०३६ व्यक्तींना अटक, अत्यावश्यक सेवेसाठी  पोलिसांकडून ५ लाख ८० हजार ७६९  पासेस वितरित, या कालावधित पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३०८ घटना , त्यात ८६७ व्यक्तींना कारवाईसाठी ताब्यात. हेल्पलाइन  १०० क्रमांकावर १,०६,५११ दूरध्वनी,  पोलिसांनी ज्यांच्या हातावर असा शिक्का  असलेल्या ८०१ व्यक्तींना शोधून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी. अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल,  ९०,०७३ वाहने जप्त.
  • कोरोना योध्दा –      कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत मुंबईतील ४३ पोलीस व ३ अधिकारी अशा एकूण ४५, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,नाशिक शहर १, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५ व ठाणे ग्रामीण १ व १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, रायगड १,जालना एसआरपीएफ १ अधिकारी व १ पोलीस , अमरावती शहर १ डब्ल्यूपीसी,उस्मानाबाद १, नवी मुंबई  एसआरपीएफ १ अधिकारी अशा ७५ पोलिस अधिकारी/कर्मचारी यांचे निधन. कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आल्यास तातडीने उपचार करणे शक्य व्हावे यासाठी सर्वत्र नियंत्रण कक्षाची स्थापना. सध्या कोरोना  बाधित १३० पोलीस अधिकारी व १०२७ पोलिसांवर उपचार सुरू.
  • आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवले असल्याची मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची प्रतिक्रिया. धारावित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के , ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६.  या स्वंयशिस्तीची आणि एकात्मिक प्रयत्नांची जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांच्याकडून विशेष दखल. कोरोना साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग, चाचण्या, रुग्णांचा शोध, अलगीकरण करून रुग्णांवर उपचार, शारीरिक अंतराचे  नियम, स्वच्छता आणि स्वंयशिस्तीचे काटेकोरपणे पालन या उपयांमुळे धारावितील कोरोना विषाणू साखळी तोडण्यात यश.  “चेस द व्हायरस” उपक्रमातून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींग या उपयांचा चार पातळीवर वेगाने अवलंब.  ४७ हजार ५०० घरांची डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यामार्फत तपासणर.  ३.६ लाख लोकांचे स्कॅनिंग. १४ हजार ९७० लोकांचे मोबाईल व्हॅनद्वारे स्कॅनिंग. ८२४६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी.  १४ हजार नागरिकांचे संस्थात्मक कॉरंटाइन. २४ खासगी डॉक्टरांचे सहाय्य. महापालिकेकडून सर्वांना  टेस्ट किटस, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमीटर आणि  वैयक्तिक सुरक्षा साधनांचा पुरवठा.
  • 140 या अंकाने  सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांका वरून आलेला फोन कॉल रिव्हिव केला तर  खात्यातील सर्व पैसे  काढले जाऊन अकाउंट शून्य होते असे समाज माध्यमांवर  फिरणाऱ्या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसून  जोपर्यंत बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा  क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड चे पूर्ण नंबर तसेच  सी. व्ही. व्ही./ पिन नंबर  शेअर करीत नाही तोपर्यंत बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नसल्याची बाब  महाराष्ट्र सायबर विभागामार्फत स्पष्ट.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. ठळक बाबी- १) संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची स्थानिक धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक. २) न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपा बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारणे आवश्यक, यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित,  घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना भपकेबाजी नसावी.  ३) श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी. ४) शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवर मूर्तीचे पूजन करा. मूर्ती शाडूची व पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरीच करा. घरी विसर्जन  करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करा. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तीचे विसर्जन माघीगणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्‍य. यामुळे  गणेशाचे आगमन/ विसर्जनासाठी गर्दी टाळता आल्याने  स्वतःचे व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण शक्य.  ५) उत्सवाकरिता देणगी/ वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्यविषयक व सामाजिक संदेशाच्या जाहिरातींना प्राधान्य द्या. ६) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी   आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करा. कोरोना ,मलेरिया, डेंगू या आजारांसाठीचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता याबाबत जनजागृती करा. ७) आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी टाळा, ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करा.  ८) श्रीगणेश दर्शनाची सुविधा ऑनलाइन केबल नेटवर्क संकेतस्थळ, फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करा. ९) गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करा, थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करा. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टसिंग), स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनीटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष द्या. १०) श्री चे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढू नका. पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबा. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढू नका. ११) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करा. १२) कोवीड -19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक. प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे आवश्यक.
  •  लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत १० जुलै २०२० पर्यंत सायबर संदर्भात ५३२  गुन्हे दाखल, २७५ व्यक्तींना अटक. तपशील-   आक्षेपार्ह व्हाट्सअॅप संदेश फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९९ गुन्हे दाखल,  आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २२५  गुन्हे दाखल,टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २८ गुन्हे दाखल, ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी १५ गुन्हे दाखल, इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल.अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यू ट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी ६१ गुन्हे दाखल. १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश.
  • आज ४३६० रुग्णांची  बरे घरी रवानगी. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के,  आतापर्यत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या- १ लाख ३६ हजार ९८५ आज ८१३९ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ९९ हजार २०२ रुग्णांवर  उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख  ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के), ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाइन. सध्या ४७ हजार ३७६ नागरिकांचे संस्थात्मक क्वारंटाइन. आज २२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ४.१ टक्के.
  •  रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती. येत्या आठवडयात रेमडेसीवीर या औषधाचे  21500 व्हायल्स उपलब्ध होणार. औषधाच्या काळाबाजाराबाबत माहिती असल्यास ती टोल फ्री क्रमांक  1800222365 वर देण्याचे डॉ. शिंगणे यांचे आवाहन.
  • धारावीकरांच्या संयमाची, करोना मुक्तीच्या लढयाची जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली आहे, अशा शब्दात शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याव्दारे भावना व्यक्त.
  • नागरिकांचे सहकार्य, स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग व महापालिका प्रशासनाने केलेले सूक्ष्म नियोजन यामुळे धारावी सारख्या दाटीवाटीच्या क्षेत्रात कोवीडचा संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नाला आलेल्या यशाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असल्याची मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अस्लम शेख यांची प्रतिक्रिया.

इतर निर्णय व घडामोडी

6 जुलै 2020 

  • महाराष्ट्र पर्यटनावर आधारित नवीन घोषवाक्य निर्मितीसाठी फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर महा टॅगलाईन स्पर्धा आयोजित. सहभागाची अंतिम मुदत १२ जुलै, संपर्क- maharashtratourismcontest@gmail.com विजेत्या स्पर्धकांना पर्यटन संचालनालयाद्वारे प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम १० हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल. 
  • वनमंत्री संजय राठोड व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून यवतमाळ वनविभाग, प्रयास व दिलासा संस्था, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे साकारण्यात आलेल्या  दहा हेक्टर रोपवनाचा शुभारंभ.

७ जुलै २०२०

  •  10 हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब, या बटालियनसाठी 1384 पदांची निर्मिती, प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात पदे भरणार. भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश.
  • उद्योगात धडाडी आणि सामाजिक क्षेत्रात बांधिलकी जोपासणारा संवेदनशील उद्योजक महाराष्ट्राने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत इचलकरंजीच्या फाय  समुहाचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष पंडितराव कुलकर्णी यांना श्रद्धांजली.
  • राज्य वन्यजीव मंडळावर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता, अध्यक्ष- मुख्यमंत्री. उपाध्यक्ष – वन मंत्री संजय राठोड. सदस्य- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा सदस्य धीरज देशमुख, वन्य जीव क्षेत्रात काम करणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री, वाईल्ड लाईफ  कॉन्झर्वेशन ट्रस्ट, इकोप्रो संस्था, चंद्रपूर या संस्थांचे प्रतिनिधी. अशासकीय सदस्य- अनुज खरे (पुणे), विश्वास काटदरे (रत्नागिरी), बिट्टू सहगल (मुंबई), किशोर रिठे (अमरावती), पूनम धनवटे, कुंदन हाते (नागपूर), यादव तरटे पाटील, सुहास वायंगणकर (कोल्हापूर)

८ जुलै २०२०

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे  तीर्थक्षेत्र आहे. या राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाजकंटकांना इशारा.
  •  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या राजगृह निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. शासनामार्फत या घटनेची गंभीर दखल. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडून स्पष्ट.
  • आदिवासी बहुल  पालघर , धुळे , नंदुरबार , नाशिक , यवतमाळ , गडचिरोली , रायगड व चंद्रपूर या  जिल्हयातील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक.
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृह या वास्तूमध्ये अज्ञात माथेफिरुकडून झालेल्या तोडफोडीचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याव्दारे तीव्र शब्दात निषेध, संबंधितांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी.

मंत्रिमंडळ निर्णय

  • जुहू बीच येथील खाद्यपेय विक्रेते को.ऑप. सोसायटी लि. यांना सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाच्या अनुषंगाने भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाच्या विहित दरानुसार भुईभाडे आकारण्याचा निर्णय.
  • महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमात सुधारणा करण्यासंदर्भात अध्यादेश प्रख्यापित करण्याचा निर्णय.
  • केंद्र शासन  प्रणित जल जीवन मिशन राबविण्यास मान्यता. या मिशनसाठी, राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन कार्यान्वयन यंत्रणा म्हणून कार्य करेल मिशन संचालक या पदासाठी भाप्रसे संवर्गातील सचिव दर्जाच्या पदाची निर्मिती. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला  नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करण्यासाठी बेस लाईन सर्वेक्षण करुन पुढील 4 वर्षाचे नियोजन. या योजनेसाठी वार्षिक ग्राम कृती, जिल्हा कृती राज्य कृती आराखड्याची निर्मिती.
  • कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे नाव आता कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता विकास करण्यास मान्यता.
  • प्रादेशिक ग्रामीण बँक, आयडीबीआय बॅंक तसेच अ वर्गातील 15 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास मान्यता.
  • मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेचा कालावधी ३१ मार्च२०२० रोजी संपुष्टात आल्याने यात  मंजूरी देण्यात आलेल्या प्रगतीपथावरील व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याकरिता या योजनेस दोन वर्षे (२०२१-२२ पर्यंत) मुदतवाढ देण्याचा निर्णय.
  • सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक. मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी जाहीर परंतु अद्याप प्रलंबित उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे श्री. चव्हाण यांचे प्रतिपादन.
  • कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी अलमट्टी धरणाविषयी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासोबत बैठक.

९ जुलै २०२०

  • भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेचे नामकरण ‘अहिल्यादेवी होळकर आवास योजना’ करण्यात आल्याची इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती.
  • सारथी संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक. ठळक मुद्दे– मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापित सारथी संस्था बंद होणार नाही. या संस्थेची स्वायत्तता कायम राहील. संस्थेला तातडीने 8 कोटींचा निधी दिला जाईल. शाश्वत विकासासाठी सारथी कडून, व्हिजन 2020-30 हा दहा वर्षाचा आराखडा तयार केला जाईल. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था यापुढे नियोजन विभागांतर्गत काम करतील.
  • पूर परिस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात समन्वय व नियंत्रण राखण्यासाठी दोन्ही राज्याची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांची माहिती.
  • मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत सारथी संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर दोन तासात हा निधी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडून संस्थेला उपलब्ध.
  • सहाय्यक विक्रीकर आयुक्त या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेली नांदेडच्या पोलीस वाहनचालकांची कन्या आस्मा आणि  फायटर पायलट झालेली नागपूरची कन्या अंतरा मेहता या दोघींचा आम्हाला सदैव अभिमान राहील, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याद्वारे या दोघींचे  कौतुक.
  • राज्याच्या जलसंपदा क्षमतेचा आढावा घेऊन जलविद्युत प्रकल्पाची क्षमता कशी वाढविता येईल यासंदर्भात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांनी संयुक्त बैठक. महनिर्मिती कंपनीकडे भाडेपट्टी तत्वावर हस्तांतरित 27 जलविद्युत प्रकल्पांचा करारनामा मसुदा अंतिम करणे, जलसंपदा विभाग व महानिर्मिती कंपनी यांच्यात प्रलंबित मुद्यांवर चर्चा, जलसंपदा विभागाकडून चालविण्यात येत असलेले 8 जलविद्युत प्रकल्प परिचालन व देखभालीसाठी महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरित करण्याबाबत विचार.

 १० जुलै २०२०

  • महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता “महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ” (Maharashtra State Board of Skill Development Examination) असे करण्यात आल्याची कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती. विविध गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार 6 महिने कालावधीचे 152 अभ्यासक्रम, 1 वर्ष कालावधीचे 96 आणि 2 वर्ष कालावधीचे 44 अर्धवेळ व पूर्णवेळ असे एकूण 292 अभ्यासक्रम सध्या सुरु.
  • निवृत्ती वेतन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा त्याची सेवा १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास मदत व्हावी यासाठी त्यांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.  
  • महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 अंतर्गत 2 हजार  कोटी रुपयांच्या रोखे विक्रीची सूचना जारी.
  • महावितरण अंतर्गत कार्यरत प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालक कार्यालयांचे बळकटीकरण करण्यासाठी त्यांना अधिकार बहाल करण्याचा उर्जा मंत्री डॉ.नितिन राऊत यांचा निर्णय.
  • सारथी संस्थेच्याकामकाजाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची पुण्यातील कार्यालयाला भेट, सारथी कार्यालयातील बैठकीत कामकाजाचा आढावा, सारथीला नवीन इमारत बांधण्यासाठी जागा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश, सारथीचे कामकाज प्रभावी करण्यासाठी  मनुष्यबळ व निधी उपलब्ध करुन देणार.  
  • मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना या समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन.

११ जुलै २०२०  

  •  इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ९ जुलै रोजी काढलेल्या पत्रानुसार २०१८ -१९ व २०१९ – २० या वित्तीय वर्षातील अखर्चित निधी २०२० – २१ मध्ये सारथी या संस्थेस खर्च करण्यासाठी परवानगी दिली असून, यासाठी सामाजिक न्याय विभागातील कोणताही निधी वळविण्यात आला नसल्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्याकडून स्पष्ट.
  • रविवार, 12 जुलै 2020 रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास येणाऱ्या हितचिंतकांना समक्ष न भेटता आपल्या शुभेच्छा दूरध्वनीच्या माध्यमातून द्याव्यात तसेच  भेटवस्तू आणणाऱ्या हितचिंतकांनी ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी द्यावी असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन.

००००


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता