मुंबई, दि.१५ : बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे आखली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी मंत्रालयात आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

श्री.शेख म्हणाले की, कंटेंटमेंट झोनमध्ये कुठलेही सण साजरे करण्यास परवानगी नसेल. बकरे खरेदी-विक्रीसाठी सरकारच्यावतीने ऑनलाईन प्रणाली स्थापित केली जाईल. कुर्बानीसाठी गर्दी करण्यास सक्त मनाई असेल. देवनार मंडीसारख्या मोठ्या मंडींना परवानगी देण्यात येणार नाही. मार्केट केवळ खुल्या मैदानातच लावले जाईल, असेही श्री.शेख यांनी सांगितले.

000


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता