भारतीय स्मार्टफोन निर्मिती कंपनी Lava ने Lava Z61 Pro हा स्मार्टफोन लाँच केला. यात कॅप्सुल टाईप कॅमेरा मॉड्यूल देण्यात आले असून या स्मार्टफोनची किंमत 5,774 रुपये आहे. 
 
Lava Z61 Pro आपल्याला अमेझॉन, फ्लिपकार्ट वर खरेदी करता येणार आहे सोबत ऑफलाईन स्टोअर वर देखील पुढच्या आठवड्यापासून खरेदी करता येणार आहे.


लावा स्मार्टफोनची वैशिष्ट्ये Lava Z61 Pro Specifications

  • ऑक्टा कोर प्रोसेसर 
  • 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज
  • मायक्रोएसडी कार्डने 128 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.
  • 8 मेगापिक्सेल रिअर
  • 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • 2 सिमकार्डचे स्लॉट असणार आहेत.
  • कॅमेऱ्याच्या फीचर्समध्ये बोकेह मोड, बर्स्ट मोड, पॅनोरमा तसेच फिल्टर्स
  • 3,100mAh क्षमतेची बॅटरी आहे.
सध्या चिनी मालावर भारतात बहिष्कार टाकण्याची मागणी वाढू लागलीय त्यामुळे बऱ्याच चिनी मोबाईल कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे हा 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन भारतीयांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.