बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे नाव रोशन करतात. यापैकी एक नाव विद्युत जामवाल आहे. त्याला यापूर्वी जॅकी चॅन अॅक्शन मूव्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या दमदार action आणि खऱ्या स्टंटद्वारे जगभरात नाव कमावणारा अभिनेता विद्युत जामवालला एक नवी उपलब्धी मिळाली आहे ज्यामुळे तो व्लादिमीर पुतिन आणि बेअर ग्रिल्स यांच्यासारख्या मोठ्या नावांच्या यादीत आला आहे.
द रिचेस्टने ज्यांचा पंगा घेणे महाग पडू शकते अश्या स्टार्सची जगभरातून यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील एकच व्यक्तीचे आहे. कमांडो मूव्ही फेम आणि मार्शल आर्ट ट्रेंड अभिनेता विद्युत जामवाल हे त्या व्यक्तीचे नाव आहे. विद्युत चित्रपटांमध्ये धोकादायक स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे यामध्ये तो आपल्यासारखा दिसणारा स्टंट मन वापरत नाही
ट्विटरवर अतुल मोहन यांनी लिहले - अॅक्शन स्टार विद्युत जामवालने पुन्हा एकदा भारताचा अभिमान वाढविला आहे. आपण 10 पीपल यू डोन्ट वॉन्ट टू मेस विद इन द वर्ल्ड अश्या लोकांच्या यादीत त्याचा समावेश आहे.
आपल्याला सांगू इच्छितो की रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, ब्रिटीश साहसी बेअर ग्रिल्स, ग्रँडमास्टर शिफू झियान मिंग, प्रसिद्ध निन्जा हातसुमी मसाकी यांची नावेही या यादीत समाविष्ट आहेत.
विद्युत जामवाल यांच्याविषयी बोलायचं तर त्याने २०११ मध्ये फोर्स या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून तो कमांडो मालिकेचा भाग आहे. त्याने बादशाहो आणि जंगलसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव यारा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तिग्मांशु धुलिया यांनी केले आहे. 30 जुलै 2020 रोजी हा चित्रपट झी 5 वर रिलीज होईल.