'Binod' ची सुरुवात Slayypoint या युट्युब चॅनेलच्या व्हिडीओमुळे झाली. Slayypoint हे चॅनल पब्लिकसाठी वेगवेगळ्या धाटणीचे रोस्ट व्हिडीओ तयार करते. तर त्यांनी १५ जुलै रोजी  एक व्हिडीओ पोस्ट केला. तर या व्हिडीओचं शीर्षक ‘Why indian comment section is garbage’असे होतं. 

कमेंटमध्ये भारतीय लोक काही कसं लिहतात, ते या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं होतं. या विडिओमध्ये  Binod Tharu नावाच्या एका युजरने कमेंटमध्ये आपलेच नाव बिनोद असे लिहले असल्याचे दाखवण्यात आले होते. तर त्या कमेंटला सात जणांनी लाइकही केलं होत.

त्यानंतर लोकांनी यावरुन विनोद करायला सुरुवात केली. थोड्याच दिवसात यावर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. करोना व्हायरस पेक्षा  वेगानं हे पसरत आहे यावर मिम्स तयार होत आहेत. 

लोकांनी 'बिनोद' नावावर आपली क्रिएटिव्हिटी वापरुन अनेक मिम्स आणि विनोद तयार केले आहेत. लोक प्रत्येक ठिकाणी बिनोद लिहू लागले त्यामुळे सोशल मीडियावर बिनोदमय झाली आहे.

   ट्विटरवर
आणि इतर सोशल मीडियावर सध्या #Binod हा टॉपिक ट्रेंड होत आहे. लोक कौशल्य आणि क्रिएटिव्हिटी लावून 'बिनोद' वर मिम्स तयार करत आहेत.