केरळ विमान दुर्घटनेमध्ये (Kerala Plane Crash) १४ प्रवाशांचा मृत्यू असून १२३ जण जखमी झाले आहेत.

केरळमधल्या कोझिकोड येथल्या विमानतळावर रात्री ८ वाजता एअर इंडियाचं (Air India Plane Crash) एक विमान लँड झालं.
मात्र विमान धावपट्टीवर असतानाच घसरलं आणि छोट्या दरीमध्ये पडलं. तर या भीषण अपघातामध्ये १४ प्रवाशी आणि पायलटचा मृत्यू झाला. तर १२३ जण जखमी झाले आहेत. यातील १५ जण गंभीररित्या जखमी आहेत. ANI ने वृत्त दिलं असून ही दुर्घटना घडताच तातडीने त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका यांच्यासह मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. आता या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Kozhikode plane Crash

14-dead-123-injured-and-15-seriously-injured-in-kozhikode-plane-crash-incident-at-karipur-airport