महाराष्ट्रामध्ये १० हजार ४८३ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासांत१० हजार ९०६ रुग्णांना सोडण्यात आल आहे. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत ३, २७, २८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे रिकव्हरी रेट हा ६६.७६ टक्के इतका झाला आहे. तर मृत्यू दर हा ३.४९ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.