मुंबई दि. १४ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३३ हजार ३५९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच २० कोटी ६२ लाख ५३ हजार ४९४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १३ ऑगस्ट या कालावधीत

अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ४३ हजार ४८४ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३३३ (८८८ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १० हजार ०६८

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –

(मुंबईतील ५५ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५९, ठाणे शहर १४ व ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी, रायगड २, पुणे शहर ३, नाशिक शहर १, सोलापूर शहर ३, अमरावती शहर १, मुंबई रेल्वे ४, नाशिक ग्रामीण ३, जळगाव ग्रामीण २, जालना एसआरपीएफ १ अधिकारी, नवी मुंबई  एसआरपीएफ १, पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी, ए.टी.एस. १, उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर ३, जालना 1, नवी मुंबई २, सातारा २, अहमदनगर २, औरंगाबाद रेल्वे १, एसआरपीएफ अमरावती १, पुणे रेल्वे अधिकारी १, PTS मरोळ अधिकारी १,

SID मुंबई १, नागपूर २, बीड १, सोलापूर ग्रामीण १, सांगली १, बुलढाणा १.

कोरोना बाधित पोलीस – २७१ पोलीस अधिकारी व १९५५ पोलीस कर्मचारी

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता