कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी सहभाग देण्याचे आवाहन

हिंगोली, दि. १४ : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत वर्षा गायकवाड या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या, इतर जिल्ह्यापेक्षा हिंगोलीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी, मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शासकीय डॉक्टर व खासगी डॉक्टर यांच्याशी चर्चा करुन नियोजन करावे. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी देखील आपला सहभाग द्यावा, असेही आवाहन यावेळी पालकमंत्री यांनी केले.

सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असुन या कालावधीत जिल्ह्यातील कंटेंन्मेंट झोन भागातील नागरिकांची तपासणी करावी. कोरोना विरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात वाढणारी रुग्ण संख्या कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही पालकमंत्री वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.

यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी खरीप हंगाम पेरणी, पाऊस, अतिवृष्टी नुकसान अनुदान वाटप, पीक कर्ज वितरण, कर्ज मुक्तीसह कोरोना विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर यांची उपस्थिती होती.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता