मुंबई, दि. २९ :  क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी राज्यातील क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. तसेच अभिनंदनाची पत्रेही पाठविली आहेत.

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांचे आज भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे वितरण करण्यात आले.

यात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू, हॉकीपटू रानी रामपाल यांना देण्यात आला.

विविध क्रीडा प्रकारातील पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील खेळाडू असे -अर्जुन पुरस्कार – चिराग शेट्टी (बॅडमिंटन) मुंबई, श्री सत्यप्रकाश तिवारी (पॅरा बॅडमिंटन), श्री नंदन बाळ( टेनिस), द्रोणाचार्य पुरस्कार श्री विजय मुनेश्वर अर्जुन पुरस्कार – घोडेस्वारी अजय सावंत (घोडेस्वारी), राहूल आवारे (कुस्ती), सारिका काळे (खो खो), दत्तू भोकनाळ (नौकानयन), मधुरिका पाटकर (टेबल टेनिस), सुयश जाधव (पॅरास्विमिंग) आणि ध्यानचंद पुरस्कार प्रदीप गंधे (बॅडमिंटन), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन). श्री केवल कक्का तेनसिंग नोर्गे पुरस्कार तर लक्ष्य इन्स्टिट्यूट (पुणे) आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्‌ मॅनेजमेंट (मुंबई) यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार मिळाला आहे. या सर्व संस्था आणि खेळाडूंचे अभिनंदन राज्याचे क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी केले.

००००००


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता