
यवतमाळ, दि. १० : वनविभागाचा मंत्री या नात्याने आदिवासी समाजाला वन तसेच वनक्षेत्र याबाबत दिलेले संविधानिक हक्क व अधिकार यांचे संरक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. वनविभागांतर्गत विविध योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सामुहिक वन हक्क व्यवस्थापनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचा विभागाचा मानस आहे. आदिवासी भागात राज्य योजनेतून तसेच जिल्हा योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास, वृक्ष व फळबाग लागवड, वन्यजीव व जैवविविधतेचे संरक्षण याबाबत वनविभाग काम करीत आहे. या योजनांचा आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
0000
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता