मुंबई, दि. ३१ : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशाने एक थोर मुत्सद्दी गमावल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, त्यांचे संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित होते. देशाची अर्थ नीती व परराष्ट्र धोरणात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. त्यांच्या रूपात भारताचे एक अनुभवी मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

 

भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्याशी चव्हाण कुटुंबियांचे घनिष्ठ संबंध होते. ते आणि डॉ. शंकरराव चव्हाण केंद्रीय मंत्रिमंडळात सहकारी होते. संघटनात्मक आणि शासकीय कामांच्या निमित्ताने मलाही अनेकदा प्रणव मुखर्जी यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळाली. ते एक अतिशय प्रतिभाशाली, अभ्यासू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद असून, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता