मुंबई दि. १८ : “ हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली आहे.

राज्यात कृषी क्रांती घडवून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे नेण्याचं काम स्वर्गीय नाईक साहेबांनी केलं. कापूस एकाधिकार योजना, धवल क्रांती, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ सारख्या असंख्य योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ दिलं. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हिताची काळजी घेत सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेल्या, राज्याला शाश्वत विकासाच्या मार्गावर नेऊन ठेवणाऱ्या स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना भावपूर्ण आदरांजली…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता