मुंबई, दि. २७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेश प्रक्रिया २०२०- २०२१ ‘ या विषयावर तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दिनांक २८, शनिवार दिनांक २९ व  सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. न्यूज ऑन एअर (newsonair) या  ॲपवरही याच वेळेत ऐकता येईल. तसेच  महाराष्ट्र डीजीआपीआरच्या (MAHARASHTRA DGIPR)  युट्यूब चॅनेलवरही हा कार्यक्रम सविस्तर पाहता येईल. शिल्पा नातू यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

या मुलाखतीत तंत्रशिक्षण संचालनालयाची वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी  १० ऑगस्ट पासून सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया, प्रवेश प्रक्रियांना दिलेली मुदतवाढ, दहावी व बारावी नंतरचे अभ्यासक्रम, ई – स्क्रुटनीची  संकल्पना, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सन २०२० च्या प्रवेश  प्रक्रिया, विद्यार्थ्यांना  दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्या, विद्यार्थी प्लेसमेंटसाठी सुरू असलेले प्रयत्न या सर्व विषयांची सविस्तर माहिती  डॉ. अभय वाघ  यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता