सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 15 : कोरोनाचे संकट ओढवलेल्या काळात जिल्हावासियांनी दिलेली साथ व जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामामुळेच कोरोनाला रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्यामुळे सिंधुदुर्गवासीय व जिल्हा प्रशासन कौतुकास पात्र आहे असे गौरवउद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे काढले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिन जिल्हा मुख्यालय पोलिस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात होता.  पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन साजरा करत असताना सिंधुदुर्ग तसेच कोकणवासीय व महाराष्ट्रातील तमाम जनतेला चांगले आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सिंधुदुर्गची पारंपरिकता सांस्कृतिकता जपण्याचं काम ज्यांनी कित्येक वर्षे केले आहे त्या सर्वांचे आभार मानतो. पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गामध्ये वावरत असताना किंवा काम करत असताना कोरोनाच संकट आपल्यावर ओढवल ते आपण पेलल आहे. प्रशासनाच्या सहकार्याने कोव्हिड लॅब ही मंजूर करण्यात आपण यस्वशी झाले आणि ती लॅब चांगल्या पध्दतीने कार्यान्वित आहे. केंद्र शासनाचे सर्व संकल्प विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी  जिल्हा प्रशासन नक्कीच सज्ज आहे. असे सांगुन पालकमंत्री पुढे म्हणाले,  कोव्हिड गेल्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्गच्या विकासाला नव्याने चालना देण्याची जबाबदारी आपली सर्वाची आहे. आणि ही चालना देत असताना सिंधुदुर्ग वासियांचे सहकार्य देखील आम्हा सर्वांना अपेक्षित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना स्वांतत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या. 

परेड कमांडर रमेश सातापे यांनी यावेळी मानवंदना दिली. राष्ट्रपती पदकाचे मानकरी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरिक्षक सुनिल धनावडे व राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा शिष्यवृत्ती प्राप्त कु. चैताली चौकेकर यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी केले. या कार्यक्रमास संजय पडते, संदेश पारकर तसेच विविध शासकिय विभागांचे  विभाग प्रमुख, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी,उपजिल्हाधिकारी जयकृष्ण फड, प्रशांत ढगे, वर्षा शिंगण-पाटील, रोहिणी रजपूत तसेच विविध विभांगाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

जिल्हा परिषदेत अध्यक्ष सुमेधा नाईक हस्ते ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषदेत जि.प.अध्यक्षा सुमेधा नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर तसेच विविध विभांगाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

न्यायालय आवारात एस.आर. जगताप हस्ते ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनानिमित्त न्यायालय आवारात प्रमुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.जगताप यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता