मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘दुग्धव्यवसायाचे बळकटीकरण, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन’ या विषयावर पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून   गुरूवार, दि.२७ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या ॲपवरही याच वेळेत ऐकता येईल. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत राज्यात लॉकडाऊनमुळे पिशवीबंद दुधाच्या मागणीत झालेली घट लक्षात घेता घेण्यात आलेले निर्णय, दुधात भेसळ होवू नये यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, अतिरिक्त दुधाचे भुकटीत रूपांतर करण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय, मिशन ऑलिम्पिक योजनेअंतर्गत खेळाडूंसाठी केलेली तरतूद, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ यासंदर्भात  सविस्तर  माहिती मंत्री केदार यांनी दिली आहे.

0000


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता