
मुंबई, दि. 14 : भारतासाठी पहिले ऑलिंपिक पदक जिंकून देणारे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा आज स्मृतिदिन. अत्यंत प्रतिकूल, खडतर परिस्थितीत, आव्हानात्मक कालखंडात त्यांनी देशाला मिळवून दिलेलं पहिलं ऑलिंपिक पदक भारतीय खेळ जगताला सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सदैव प्रेरीत करीत राहील. महाराष्ट्राच्या या सुपुत्राला, स्वर्गीय खाशाबा जाधव साहेबांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.
0000
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता