मुंबई, दि.१ : महाड दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता नावेद यांनी ३५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. यामध्ये त्याला आपले दोन्ही पाय गमाविण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर सध्या नेरूळ येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची तब्बेत आता चांगली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

आज श्री. सामंत यांनी नावेद यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

श्री.सामंत म्हणाले, नावेदला आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. त्याच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होत असून तो लवकर बरा होईल.

नावेद यांनी महाड दुर्घटनेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शौर्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या शौर्याची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. असे अश्वासन दिले. तसेच त्याच्या तब्बेतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. नावेद यांची प्रकृती व्यवस्थित आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या वतीने श्री.सामंत यांनी नावेद यांच्या कुटुंबियांना यावेळी २ लाख रूपयांची मदत केली.

0000


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता