जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

“बोलघेवडेपणा सोडा व कृती करा,” देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल | devendra Fadanvis At Hingoli

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे परतीच्या पावसाने फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत.



आज हिंगोली दौऱ्यावर असून वसमत येथील शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली यावेळी सरकारने येथील शेतकऱ्यांच्यासाठी तात्काळ मदत करावी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. पत्रकारांशी संवाद साधत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावू नये, सरकारने बँकांना आदेश द्यावेत अशी मागणी केली.

यावेळी फडणवीस म्हणाले “मला असं वाटतं की सरकारमध्ये फक्त बोलणारे आहेत. सगळे मंत्री रोज माईक घेऊन बोलत आहेत, मीडियात येऊन बोलत आहेत. पण शेवटी पाहणार कोण आहे? निर्णय कोण घेणार आहे? सरकार निर्णय घेण्यासाठीच आहे. कोणताही निर्णय होताना दिसत नसून फक्त टोलवाटोलवी सुरु आहे. सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. त्यांचा आक्रोश समजून तात्काळ निर्णय घ्या."

“आम्हास जयंत पाटलांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जयंत पाटलांनी आम्हाला खोटं ठरवण्याऐवजी मदत करा ना. लोक इतके अडचणीत आहेत, पण पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा,” असा टोला यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लगावला.




व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या