अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा या मोहिमेनंतर मनसेचे आता डिस्ने हॉटस्टार प्लस या विडिओ स्ट्रीमिंग कंपनीला पत्र पाठवलंय. सध्या IPL सामन्यांचे प्रक्षेपण सुरु असून या सामन्यांचे समालोचन मराठीमध्ये करण्यात यावं, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.



मनसे कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी ट्विटरवर याबद्दलचे पत्र शेअर केलं आहे. या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे, IPL चे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कन्नड आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध आहे. पण या अ‍ॅपमध्ये मराठीचा पर्याय दिला नाहीये. आयपीएल या क्रिकेट लीगचा सर्वात जास्त प्रेक्षक वर्ग हा मराठी असूनही तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचं दिसतंय. अस त्यांनी म्हटलं आहे.

आयपीएलचा हा हंगाम संपण्यापूर्वी हॉटस्टार कंपनीने मराठी भाषेमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा ही विनंती. जर या कंपनीने वेळेत यासंदर्भात निर्णय घेतला नाही तर ‘मनसेच्या प्रचलित पद्धतीने आंदोलन करावं लागेल, अशा इशाराही मनसेने पत्राअधून दिला आहे.



 प्रति,

गौरव बॅनर्जी

प्रेसिडेंट स्टार टीवी

२६वा मजला,उर्मी इस्टेट,

गणपतराव कदम मार्ग.लोवर परळ (पश्चिम)

मुंबई ४०००१३

सस्नेह जय महाराष्ट्र!

विषय: होटस्टार या ओ.टी.टी. व्यासपीठावर आय.पी.एल. टी-२० क्रिकेट सामान्यांच्या समालोवनासाठी (Commentary) इतर प्रादेशिक भाषांप्रमाणे मराठी भाषेचा पर्याय असण्याबाबत.


मा. महोदय,

पत्रास कारण नेहमीचेच आहे, मराठी भाषेला दिल्या जाणा-या दुय्यम दर्जाबाबत. सध्या आपल्या हॉटस्टारया ओ.टी.टी. व्यासपीठावर आय.पी.एल. चे टी-२० सामने दाखविण्यात येत आहेत.असे निदर्शनास येत आहे कि आपल्या व्यासपीठावर हे सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांना खेळाचेसमालोचन ऐकण्यासाठी त्यांच्या पसंतीची भाषा निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यात हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, कनडा आणि बंगाली भाषा निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे परंतु महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा मराठी भाषेचा पर्याय तिथे उपलब्ध नाही.

आपले मुख्यालय महाराष्ट्राची राजधानी मुंबईत असून आय.पी.एल. टी-२० चे सामने पाहणारा मोठ्या प्रमाणात असलेला प्रेक्षकवर्ग मराठी भाषिक असताना देखील आपल्याला मराठी भाषेचा विसरपडल्याचे दिसते.

आपणांस विनंती कण्यात येते कि आय.पी.एल. टी-२० २०२० वा हंगाम संपण्यापूर्वी मराठी भाषेत समालोचन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध शता जेणेकरून मराठी भाषिक प्रेक्षकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत क्रिकेट सामान्यांचा आनंद घेता येईल.

आपण तसे न केल्यास मराठी भाषेचा योग्य सन्मान राखण्यासाठी आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रवलित पद्धतीने आंदोलन करावे लागेलव त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. धन्यवाद!