जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

रिलायन्स Jio 5G तंत्रज्ञान आणणार; अमेरिकेत यशस्वी चाचणी

रिलायन्स जिओने अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी क्वालकॉमच्या सहकार्याने अमेरिकेत सॅन डिएगो येथे 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतली असून या चाचणीमध्ये 1gbps स्पीड मिळाला आहे.

यावेळी रिलायन्स जिओचे मॅथ्यू ओमान यांनी क्वालकॉम इव्हेंटमध्ये सांगितले की, "क्वालकॉम आणि रिलायन्सच्या सहाय्यक रेडिसिस यांच्यासमवेत आम्ही 5G तंत्रज्ञानावर काम करत आहोत, जेणेकरून ते लवकरच भारतात सुरू केले जाऊ शकेल."

📲 _आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 


याची तयारी कशी झाली सुरू

📌 सुमारे तीन महिन्यांपूर्वी, 15 जुलै रोजी रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत 5G तंत्रज्ञान सुरू करण्याची घोषणा केली होती.

📌 या सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी म्हणाले होते की, "रिलायन्स जिओ 5G स्पेक्ट्रम उपलब्ध होताच 5G तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास तयार आहे."

📌 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आतापर्यंत भारतात 5G तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध नाही. आता टेक्नॉलॉजी संपूर्णपणे सर्व पॅरामीटर्सवर उत्कृष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे. 

अनेक देशांनी कोरोना विषाणूमुळे चिनी कंपनी हुआवेईवर बंदी घातली आहे. हुआवेई ही एक चिनी कंपनी असून 5G तंत्रज्ञान विकसित करत आहे. आता रिलायन्स जिओ जगभरामध्ये या चिनी कंपनीची जागा भरून काढू शकेल.


व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या