जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा. Joe Biden tweets navratri wish

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार जोरामध्ये सुरु असून डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन (Joe Biden) हे रिपब्लकन पार्टीकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहे. 
या निवडणुकीच्या धामधुम मध्ये जो बायडेन यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज नवरात्रीचा उत्सव सुरु झाला आहे.

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, 
“हिंदू सण नवरात्री सुरु झाला आहे. अमेरिका आणि जगभरात नवरात्रीचा सण साजरा करणाऱ्या सर्वांना जिल आणि माझ्याकडून शुभेच्छा. चांगल्याचा वाईटावर पुन्हा एकदा भव्य विजय होईल. एक चांगली सुरुवात होईल, सर्वांना संधी मिळेल” 
(Joe-biden-tweets-navratri-wish-says-may-good-once-again-triumph-over-evil)

भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक हा अमेरिकेत स्थायिक झालेला स्थलांतरितांचा दुसरा सर्वात मोठा गट आहे. भारतीय वंशाच्या नागरिकांची मते मिळवण्यासाठी डेमोक्रॅट आणि रपब्लिक दोघांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. जो बायडेन यांनी याआधी गणेश चतुर्थीच्याही शुभेच्छा दिल्या होत्या. 
त्यावेळी त्यांनी “अमेरिका, भारत आणि जगभरात गणेश चतुर्थी साजरी करणाऱ्या प्रत्येकाला सर्व अडथळयांवर मात करता येऊ दे, नव्या सुरुवातीकडे जाणारा मार्ग मिळूं दे” अशा शब्दात  ट्विट केलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या