जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

अभिनेत्री Kangana Ranaut व तिच्या बहिणीविरोधामध्ये वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये FIR दाखल

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चांडेल यांच्या विरोधामध्ये मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंदवण्यात आला आहे.
(FIR-registered-against-kangana-ranaut-and-her-sister-rangoli-chandel)
तर १२४ अ सह वेगवेगळ्या कलमांतर्गत कंगना यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना अभिनेत्री कंगना रणौतविरोधात FIR दाखल करण्याचा आदेश दिला होता. Kangana Ranaut आणि तिची बहीण रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे.

वांद्रे कोर्टामध्ये कंगनाच्या विरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. या याचिकाकर्त्यांना प्रथम वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावेळी कोर्टाने कंगनाविरोधात FIR दाखल कऱण्याचा आदेश दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या