जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

मराठी भाषा - Marathi language

 इंडो-युरोपीय भाषाकुळा मधील असणारी मराठी  भाषा एक आहे. 'मराठी' या भाषेची गणना भारतातल्या अधिकृत 22 भाषेत केला जातो.  महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा मराठी असून शेजारी असणाऱ्या गोवा राज्याची सहाधिकृत भाषा आहे. 

From which session will Marathi become compulsory in Maharashtra

आपल्याला सांगू इच्छितो की, मराठी ही भाषा मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येने जगामधली दहावी भाषा आहे तर भारतामधील 3 री भाषा आहे. 

भारतातल्या प्राचीन भाषेपैकी मराठी ही एक प्राचीन भाषा आहे. ही भाषा महाराष्ट्रातील प्राकृत भाषेचे आधुनिक रूप आहे. भारतातील महाराष्ट्र हा राज्य मराठी भाषिकांचे राज्य म्हणून वेगळे महत्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषेचा गौरव केला आहे. 

2011 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषा बोलणार्याची संख्या एकूण 9 कोटीच्या घरात आहे.

मराठी भाषेचा वापर महाराष्ट्र, गोवा, गुजरात, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू येथे केला जातो.

मराठी भाषेमध्ये अनेक बोलीभाषा आहेत. यात कोकणी, कोळी, अहिराणी, माणदेशी, आगरी, वऱ्हाडी, मालवणी असे बोलीभाषा आहेत.

पूर्वी मराठी भाषा लिहण्याची लिपी मोडी होती. तर आता ही भाषा देवनागरी लिपी मध्ये लिहिली जाते. अलीकडे मोडी लिपी लोप पावत चालली आहे. ही लिपी वाचवण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करत आहेत.

संदर्भ: मराठी भाषा विकिपीडिया

From which session will Marathi become compulsory in Maharashtra

चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठीची सक्ती; अन्यथा कारवाई करणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई, दि. १ : राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 

राज्यातील सीबीएसई आयसीएसई, तसेच केंब्रिज यांच्यासह आतंरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांनाही मराठी शिकविणे या वर्षापासून सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी अनिवार्य करणाऱ्या शासन निर्णयाचे शाळा पालन करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास शाळांवर कारवाई करण्याचे अधिकार त्या विभागातील उपसंचालकांना देण्यात आले आहेत.

On which date Marathi language is mandatory in Maharashtra state?

पहिली  सहावीत मराठी सक्तीची अंमलबजावणी याच वर्षांपासून

राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिली आणि सहावीसाठी, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, तर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी, तर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला होता. या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल, असे आश्वासन मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात दिले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या