जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

चहाने वाचविला 'त्या' दोघांचा जीव

कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात अचानक उभ्या असलेल्या व नगरकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या एका कारवार माळशेज घाटात दरड कोसळली आहे. यात कारचे नुकसान झाले तर दोघेजण बचावले आहेत.सम्पूर्ण घटना अशी की, माळशेज घाटमध्ये सध्या पाऊस आणि दाट धुके आहे. या घाटामधून शुक्रवारी सायंकाळी दोन मित्र कारने मुंबईला जात होते.


चहा पिण्यासाठी ते माळशेज घाटात कार बाजुला लाऊन खाली उतरले. हॉटेलमध्ये पोहचताच याच वेळी कारवर मोठी दरड कोसळली. यात कारचा चक्काचूर झाला. गाडीत कुणी नसल्याने दुर्घटना टळली. घाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके पसरलेले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दरड कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. तसा विशय गहन आहे . समजा न थांबून पुढे गेले असतेच तर किमान अपघात झालाच नसता .उदा. गाडी लावली चालत हाँटेलला गेले किमान ५ मि. लागले आसतिल तोच वेळ वाहन चालविले असते तर किमान ३०० मिटर पुढे असते . करा भाऊ विचार करा.

    उत्तर द्याहटवा