अभिनेता सोनू सूदने(Sonu Sood) भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सोनू सूदने 'संभवम' ही शिष्यवृत्ती योजना लाँच केली आहे.

'संभवम' या योजनेच्या माध्यमामधून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मोफत प्रशिक्षण, उत्तम मार्गदर्शकांची उपलब्धता आणि व्यक्तिमत्व विकासासाठी काम केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे.