कधी आहे गुरुपौर्णिमा 2021? GURU PURNIMA 2021 DATE
नमस्कार या वर्षी गुरुपौर्णिमा 24 जुलै 2021 रोजी असून या दिवशी आपल्या गुरूंना सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा, ग्रीटिंग, देण्यासाठी वरील फोटोचा उपयोग आपण करू शकाल.
का साजरा केला जातो गुरूपौर्णिमा ?
या दिवशी महर्षि वेद व्यास जी यांचा जन्म झाला होता. तर व्यास जी यांना प्रथम गुरुची पदवी देखील दिली गेली आहे कारण गुरू व्यास यांनीच मानवजातीला प्रथम चार वेदांचे ज्ञान दिले होते. म्हणून गुरु पौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला जातो. तसेच व्यास पूर्णिमा असेही या पौर्णिमेला म्हणतात.
गुरुपौर्णिमेचे महत्व
भारतीय संस्कृती मध्ये गुरुंना विशेष महत्त्व आहे. भगवंत प्राप्तीचा मार्ग केवळ गुरूने दाखविलेल्या मार्गावरच शक्य आहे कारण केवळ गुरूच आपल्या शिष्यास चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखतो आणि त्याला योग्य मार्गावर जाण्यासाठी प्रेरित करतो. यामुळेच गुरुपौर्णिमा (GuruPurnima) हा सण आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुंच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.