जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

गुगलने न्यूरोलॉजिस्ट लुडविग गुटमन यांच्या जयंतीनिमित्त बनवले डूडल; Ludwig Guttmann Google Doodle

न्यूरोलॉजिस्ट लुडविग गुटमन (Ludwig Guttmann) यांचा 122 वा जन्मदिन साजरा करत असताना गुगलने त्यांचे डूडल बनवले आहे. लुडविग गुटमन यांचे कार्य दर्शवण्यासाठी गुगलने एक खास डिझाईन बनवले आहे. सर लुडविग ‘पॉपपा’ गुट्टमॅन हे एक जर्मन-ब्रिटीश न्यूरोलॉजिस्ट होते. त्यांनी इंग्लंडमध्ये अपंगांसाठी पॅरालिम्पिक गेम्स, स्पोर्टिंग इव्हेंट 'स्टोक मॅंडेविले गेम्स'ची स्थापना केली. सध्या ही स्पर्धा ऑलिम्पिक एवढी महत्वाची मानली जाते.


लुडविग गुटमन इन्फोर्मेशन इन मराठी  (Ludwig Guttmann information in marathi) 

 लुडविग गुट्टमॅन यांचा जन्म टोस्ट जर्मन साम्राज्य येथे 3 जुलै 1899 रोजी झाला. तर सध्या हे शहर पोलंडमध्ये आहे. ते 3 वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब सिलेशियनमध्ये (Silesian) मध्ये स्थलांतर झाले. पुढे येथूनच त्यांनी 1917 मध्ये माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1918 मध्ये त्यांनी University of Breslau येथून मेडिकलचा अभ्यास सुरु केला. त्यांचा हा अभ्यास 1924 मध्ये पूर्ण झाल्यानंतर 1933 मध्ये ते एक न्यूरोसर्जन म्हणून काम करू लागले आणि त्याचसोबत ते युनिवर्सिटीजमध्ये लेक्चर देत असत.

पॅरालंपिक खेळ बद्दल माहिती

29 जुलै 1948 रोजी स्टोक मॅंडेविले हॉस्पिटलमध्ये (Stoke Mandeville Hospital) युद्धामध्ये अपंग झालेल्या लोकांचे पहिले स्टोक मॅंडेविले गेम्स आयोजित केले होते तो दिवस लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाचा  दिवस होता, यात सहभागी स्पर्धकांना पाठीच्या कणाची दुखापत झाली होती. म्हणून यातील सर्वांनी व्हीलचेअर्सद्वारे  भाग घेतला होता. तर आपल्या रूग्णांना या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी गुट्टमन या 'पॅराप्लेजिक गेम्स' हा शब्द वापरायला सुरुवात केली. त्यानंतर हा खेळ 'पॅरालंपिक खेळ' म्हणून ओळखला जाऊ लागला.


गुट्टमॅन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने वयाच्या 80 व्या वर्षी 18 मार्च 1980 रोजी त्यांचे निधन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या